Corona virus news:बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण!

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण!
मलकापूरात आज पुन्हा सापडले ६ रुग्ण

बुलडाणा: अमरावती विभागातील कोरोना विषाणूचा सर्वात पहिला रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळला होता. तसेच विदर्भातील कोरोना रुग्णचा पहिला मृत्यू बुलढाणा जिल्ह्यातच झाला होता.
आज,गुरुवार ११ जून रोजी मलकापूर शहरात पुन्हा नवे ६ रुग्ण आढळून आल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल १०२ वर जाऊन पोहोचल्याने, जिल्ह्यात कोरोनाने शतक पूर्ण झाले आहे.

आज प्राप्त झालेल्या शासकीय अहवालांमध्ये मलकापूर शहरात ६ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.  तर मलकापूर तालुक्यात एक कोरोना रुग्ण मिळून आला आहे. या सहात ४ पुरुष आणि दोन महिला आहेत.

आतापर्यंत १६११ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ९६ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत ६६ कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ६६ आहे.  सध्या रूग्णालयात २७ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा माहिती अधिकार यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
......................................................

टिप्पण्या