कोरोनामुळे आधीच अडचणीत; त्यात वित्तीय संस्था मागतात कर्जाचे हफ्ते!
वित्तीय संस्थांनी नागरिकांकडे कर्जाची हफ्ते भरण्यासाठी तगादा लावू नये
वंचित बहुजन आघाडी अकोला आणि प्रबुद्ध भारत संस्थेची मागणी
अकोला : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे आकडे दररोज वाढतच आहेत. त्यातच केंद्र सरकारने आणि त्यानंतर राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांवर बिकट आर्थिक स्थितीमध्ये जगण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक घराबाहेर जाण्यासाठी धजावत नसल्याने आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. मात्र काही खाजगी वित्तीय संस्था तर काही बँका,खाजगी वित्तीय संस्था ह्या नागरिकांना कर्ज वसुलीसाठी कर्जाची हफ्ते भरण्यासाठी सारखा तगादा लावत आहेत. वित्तीय संस्थांनी नागरिकांकडे कर्जाची हफ्ते भरण्यासाठी तगादा लावू नये,अश्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी अकोला आणि प्रबुद्ध भारत संस्थेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यलय येथे देण्यात आले.
नागरिक आधीच आर्थिक संकटात असतांना या वित्तीय संस्था नागरिकांना आणखी आर्थिक संकटात लोटत आहेत . काही महिन्यांपासून नागरिकांना रोजगार उपलब्ध नसल्याने उत्पन्न नाही. आणि वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी सतत पैश्यांची मागणी करीत असल्याने नागरिक चिंतातुर झाले आहेत. त्यांना या मानसिक धक्क्यातुन बाहेर काढण्यासाठी या वित्तीय संस्थाची सततची पैश्यांची मागणीला थांबवावे ,अन्यथा वंचित बहुजन आघाडी अकोला आणि प्रबुद्ध भारत संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरचे होणारे परीणामास बँक व खाजगी वित्तीय संस्था हेच जबाबदार असणार आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रबुद्ध भारत संस्था तारफैल अकोलाचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी चंद्रशेखर नकाशे, सोनु वासनिक, सिद्ध डोंगरे, सिद्धार्थ खोब्रागडे ,राजू रामटेके, मुकेश खोबरागडे, मारुती वासनिक, सागर वानखडे ,अमोल ओके, प्रथमेश मडामे, सुरज मेश्राम, शिवा वासनिक ,बिट्टू मंडे, आर्यन मेश्राम, मनीष रामटेके, प्रज्वल मेश्राम ,यश बोरकर, दीक्षांत गजरे, प्रशिक मेश्राम, अंकित मेश्राम, रवी गवई, अक्षय सहारे, सनी डोंगरे ,कुणाल डोंगरे, आशिष मेश्राम आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
.........
Corona is already in trouble; Financial institutions ask for loan weeks!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा