देह दान...श्रेष्ठ दान...वसंतराव जोशी कालवश!
ज्या महाविद्यालयात मुले शिकली;त्याच महाविद्यालयात देहदान करण्याचा केला होता संकल्प!
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: प्रचलित रूढी आणि परंपरेच्या जखड्यात अडकलेला भारतीय समाज आजही मरणोत्तर देहदान करण्याला देखील मान्यता देत नाही.मात्र,अकोल्यातील जोशी कुटुंबीयांनी या धार्मिक रूढी,परंपरेला छेद देत, आपल्या वडिलांची अंतिम इच्छापूर्ण केली.
नागपूर येथील न्यू रामदासपेठ मधील रहिवासी वसंतराव शिवरामपंत जोशी यांचे सोमवार १ जून रोजी दुपारी २ वाजता , अर्नेजा हॉस्पिटल , रामदासपेठ , नागपूर येथे , वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले . त्यांचे चिरंजीव ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. हेमंत जोशी (अकोला) व डॉ. संजय जोशी (युके) यांनी वसंतराव यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिवदेह गव्हर्नर्मेंट मेडिकल कॉलेजमधील अनोटॉमी विभागात दान केला.
ज्या कॉलेज मधून आपल्या मुलांनी वैद्यकीय शिक्षण घेतले , त्याच कॉलेजला देहदान करण्याचा संकल्प वसंतराव यांनी केला होता.आपले शरीर मरणोत्तरही इतरांच्या कामी यावे.ज्यांचे निसर्ग आणि पृथ्वीतलावर प्रेम आहे,अश्या सर्वांनी देहदान,अवयव दान करावे.देहदान, अवयव दान ,रक्तदान सर्वश्रेष्ठ आणि सर्वांग सुंदर असे दान आहे. या दानामुळे अनेकांच्या आयुष्यातील नैराश्य घालवून हास्य फुलवू शकतो. मरणासन्न असलेल्या रुग्णाला नव आयुष्य देवू शकतो,असे वसंतराव यांचे देहदान बद्दलचे विचार होते.आणि याबाबत ते अनेकांना नेहमी सांगून प्रोत्साहित देखील करीत होते. वसंतराव यांच्या संकल्पाचे आणि उदारतेचे आज सर्वदूर कौतुक होत आहे .
वसंतराव जोशी दूरदृष्टी ठेवणारे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे गृहस्थ होते. त्यांनी अकोला रेल्वेमध्ये आयुष्यभर सेवा दिली. मनमिळावू स्वभावामुळे त्यांच्याजवळ मित्रवर्ग खूप मोठा होता.त्यामुळे शत्रूत्वाला त्यांच्याकडे स्थान नव्हते. त्यांच्या पश्चात पत्नी सुशीला जोशी,दोन मुले आणि दोन मुली असा आप्त परिवार आहे.जोशी कुटुंबियांनी वसंतराव यांचे देहदान मरणोत्तर जाहीर केले आहे.यामध्ये डॉ कामडी एचओडी अनाटॉमी, डॉ ठाकरे ,श्री रहाटगावकर महावितरण INSRUCTOR कोराडी एसआरआय अशोक पत्की नागपूर अनेजा अँड हॉस्पिटल नागपूरचे, ध्रुव पॅथॉलॉजी डॉ मुंदडा ,डॉ.हेमंत जोशी ऑर्थोपेडिक सर्जन अकोला यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा