गाव निर्जंतुकीकरण करून साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळा

गाव निर्जंतुकीकरण करून साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळा
विराहित येथील साथ सेवकांनी गावाला निर्जंतुकीकरण 
अकोला:COVID-19 (कोरोना) च्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी प्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होऊ शकत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, की स्वराज्य संकटातून काढण्यासाठी प्रत्येक मावळ्यांने झटले पाहिजे, म्हणून आज देशावर आलेल्या ह्या संकटावर मात करण्यासाठी विराहित या गावामधील "साथ सेवक फाउंडेशन" च्या तरुण सेवकांनी गाव निर्जंतुकीकरण(sanitize) करण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांचा 346 वा राज्याभिषेक अनोख्या प्रकारे साजरा करण्यात आला. त्यामध्ये महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हारारअर्पण करण्यात आले. त्यानंतर "साथ सेवक फाउंडेशन" च्या शेतकरी पुत्र सेवकांनी महाराजांना मुजरा करून, उपस्थित मंडळींना "मास्क" वाटप केले. संपूर्ण गावाला निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. या महामारीचा सामना करत असताना आपण काळजी घेणे गरजेचे आहे. हे गावकऱ्यांना पटवून देत जनजागृती करण्यात आली. साथ सेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून, अभिनव प्रकारे साजरा करण्यात आला. 
यामध्ये गावातील सर्व जातीधर्माचे साथ सेवक मंडळी सहभागी झाले होते. तसेच  निखिल, दिनेश, शुभम, गोपाल, ऋषिकेश, युवराज, अक्षय, रोहीत,अजय, शंकर, अभीषेक, गौरव,रामू,निखील, प्रविण, आशीष, ओम, सागर ,अनूकेत,अक्षय प्र., शाम, निखील , अक्षय  राऊत.वैभव,मयूर महल्ले,विक्की, प्रदीप वाघमारे, सागर पाटील, शाम कांबळे,मंगेश भोयर, रहमान खान आदी साथ सेवक उपक्रमात सहभागी झाले होते.
.........

टिप्पण्या