निमकर्दा बस स्थानकावरील जीवघेणे खड्डे ग्रामपंचायत भूजवणार का?

निमकर्दा बस स्थानकावरील जीवघेणे खड्डे ग्रामपंचायत भूजवणार का?
                 संग्रहित छायाचित्र
 
अकोला: अकोला ते निमकर्दा हा रोड गेल्या पाच वर्षांपासून अंत्यत खराब झालेला आहे. रोडची अक्षरशः चाळणी झालेली आहे. गेल्या पाच वर्षांपासून कोणी ही लक्ष देत असताना दिसून येत नाही, ज्यांच्या अधिकार क्षेत्रात हे काम आहे  ते संबंधित अधिकारी किंवा प्रशासन लक्ष देत नसल्याने प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे अनेकांना पाठीच्या मणक्यांचे आजार वाढले आहे,असा आरोप बहुजन मुक्ती पार्टी "चे जिल्हा उपाध्यक्ष सारंग निकाडे यांनी केला आहे.
निमकर्दा येथील बस स्थानकावरील जीवघेणे खड्डे नक्कीच एखाद्याचा बळी जात़ो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.बस स्थानकावरील जीवघेणे खड्डे बऱ्याच वर्षांपासून जसे ते तसेच आहे. ग्रामपंचायत कार्यालय काही ही करताना दिसत नाही, गावात पायलीचे पंधरा नेते असून भोपंजी व टोपनजीची संख्या बरीच असूनही कोणीच लक्ष देत नाही. गावातील व गलीच्छ राजकारणामुळे  प्रवाशाना नाहक त्रास होत आहे,असे निकाडे यांनी सांगितले.
 या सर्व दिरंगाईला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस किंवा फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये ? बसस्थानकावरील खड्डे पावसाळ्या पूर्वी बुजवीण्यात यावे, अन्यथा होणा-या परिणामास संबंधित अधिकारी,
 कर्मचारी व प्रशासन यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्याचा इशारा " बहुजन मुक्ती पार्टी "चे जिल्हा उपाध्यक्ष सारंग निकाडे मोरगाव सादिजन यांनी इशारा दिला आहे.
............
        

टिप्पण्या