- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रतिबंधीत क्षेत्र वगळून संपूर्ण शहराचे होणार सर्वेक्षण!
अकोला,दि.३:शहरात कोव्हिड - 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने संपुर्ण अकोला शहराचे सर्वंकष सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यासाठी ४२६ टिम तयार करण्यात आल्या असुन प्रतिबंधीत क्षेत्र वगळून संपुर्ण शहराचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
या प्रत्येक टिमकडे पल्स ऑक्सीमिटर, मास्क , सॅनिटायझरची बॉटल व अर्ज नमुना देण्यात आला आहे. या प्रत्येक टिमला विशिष्ट भाग नेमुन देण्यात आला आहे. ही टिम त्या भागातील सर्व घरांना प्रत्यक्ष भेट देवून अर्ज नमुन्यात माहिती भरणार आहे. यात घर क्र. सदस्याचे नाव, वय, प्रवासाची माहिती, दुर्धर आजार, उपचार सूरू आहे किंवा सर्दी, खोकला, ताप, दम लागणे इ. लक्षणे तसेच प्लस ऑक्सीमिटर द्वारे प्रत्येकाचे पल्स व शरिरातील ऑक्सीजन प्रमाणाची नोंद घेण्यात येणार आहे. या मोहिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व उपविभागीय अधिकारी डॉ निलेश अपार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा