- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला रेल्वेस्थानकावरुन १ जून पासून गाड्या सुरु
अकोला दि.३१:अकोला रेल्वेस्थानकावरुन सोमवार दि.१ जून पासून चार रेल्वे गाड्या सुरु होणार आहेत, असे अकोला रेल्वेस्टेशनचे प्रबंधक यांनी कळविले आहे. त्यात गाडी क्रमांक ०२८०९ मुंबई ते हावडा (अकोला येथे येण्याची वेळ सकाळी सहा वा. पाच मि. नी.), गाडी क्रमांक ०२८३३ अहमदाबाद ते हावडा (दुपारी १३ वा २५ मि. नी.), गाडी क्रमांक ०२८१० हावडा ते मुंबई (सायं. १८वा. ४० मि. नी.) , गाडी क्रमांक ०२८३४ हावडा ते अहमदाबाद (रात्री २३ वा १५ मि. नी.) या प्रमाणे गाड्या सुरु होत आहेत, असे स्टेशन प्रबंधक अकोला यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास कळविले आहे. याठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सज्जता केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित करुन रेल्वे प्रवाशांसाठी प्रमाणित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाने पथक येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणी व अन्य अनुषंगिक बाबींची व्यवस्था पाहिल.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
Badnera To Akola Reservation karav lagel ki unreserved ticket Milel
उत्तर द्याहटवा