Arvind Bansod:अरविंद बनसोड यांच्या मृत्यूबद्दल संदिग्धता: सीबीआय चौकशी व्हावी-प्रकाश आंबेडकर 'suspected' death of Bansod, demand for CBI inquiry

अरविंद बनसोड यांच्या मृत्यूबद्दल संदिग्धता: सीबीआय चौकशी व्हावी-प्रकाश आंबेडकर

    #JusticeforArvindBansode

अकोलाअरविंद बनसोड यांच्या निधनानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे.  त्यामुळे आता या परिस्थितीत पोलिस निष्पक्षपणे कार्य करतील का, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.


काय म्हणाले प्रकाश आंबेडकर 

''अरविंद बनसोड प्रकरणातील तपास अधिकारी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतू, वास्तविकता वेगळी आहे.अरविंद बनसोडला ठार करण्यात आले. परंतू, आता आरोपीकडून अरविंदने विष खावून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात येत आहे. पोलिसही आरोपींची पाठराखण करीत आहे. मुख्य म्हणजे या प्रकरणात, मारेकरी स्वत: पीडितला रुग्णालयात घेऊन गेला होता. मारेकरी गृहमंत्र्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आम्हाला वाटते की, अरविंद बनसोड यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.''

प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

येथे क्लीक करून पहा व्हिडीओ:काय म्हणाले ऍड. प्रकाश आंबेडकर


काय आहे घटना...

अरविंद बनसोड हे नागपूर जिल्ह्यातील नरखेड तहसील येथील पिंपळधारा गावचे रहिवासी होते. २७ मे रोजी जेव्हा तो मित्र गजानन राऊत याच्याबरोबर काही वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडला, तेव्हा त्याने मोटार सायकलवरून जाताना एलपीजी गॅस एजन्सीचा फोटो घेतला.  यानंतर एजन्सीचा मालक मितिलेश उमरकर चिडला. अरविंद आणि गजानन याच्या सोबत उमरकरने वाद घातला.


या घटनेनंतर बनसोडने राऊतला त्याच्या मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यास सांगितले. दरम्यान, त्याने जवळच्या दुकानातून कीटकनाशक विकत घेतले.  राऊत जेव्हा घटनास्थळी परतला तेव्हा बनसोड जमिनीवर पडलेला आढळला.  नंतर अरविंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांचा २९ मे रोजी मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.



नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटूंबाच्या तक्रारीनंतर आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी भा. दं. वि. कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. "कीटकनाशकाच्या दुकानाच्या मालकापासून ते पेट्रोल पंपवर काम करण्यांपर्यंत प्रत्येकाची चौकशी करून बयान नोंदविले जात आहे."


राष्ट्रवादीवर आरोप

एलपीजी गॅस एजन्सीचा मालक राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अधिकारी असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जवळचे नातेवाईक असल्याने  पोलिस त्याला संरक्षण देत आहेत,असा आरोप होत आहे. नरखेड तहसील हे काटोल विधानसभा मतदार संघात येते. त्याचे प्रतिनिधित्व अनिल देशमुख यांनी केले आहे.


सोशल मीडियावर आंदोलन

प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद यांना या प्रकरणात ट्विट करुन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, लोक #JusticeforArvindBansode या हॅशटॅगसह सोशल मीडियावरही ट्विट करत आहेत. नागपूर मधील युववर्गाने या हॅशटॅग द्वारे आंदोलन सुरू केले आहे.

या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

.........

टिप्पण्या