Cyber crime:लॉकडाउन संदर्भातील मेसेज व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध सायबरसेल कडे तक्रारपुणे-मुबंई संदर्भातील पोस्ट खोडसाळ

लॉकडाउन संदर्भातील मेसेज व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध सायबरसेल कडे तक्रार

पुणे-मुबंई संदर्भातील पोस्ट खोडसाळ

अकोला,दि.२६: जिल्ह्यात लॉकडाऊन कशाप्रकारे खुला राहणार? कोणती दुकाने खुली राहणार आदी संदर्भात माहिती देणारा मेसेज मंगळवारी सकाळ पासून जिल्ह्यात व्हायरल झाला होता. हा मेसेज फेक म्हणजेच असत्य असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून, या संदर्भात सायबर सेल कडे तक्रार करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की,  हा मेसेज  चुकीचा आहे. हा मेसेज अकोला जिल्हा प्रशासनाचा नसून  यामध्ये  कुठेही अकोला जिल्ह्याचा उल्लेख नमूद नाही, यावर कोणीही विश्वास ठेवू नये. अकोला जिल्ह्यात दिनांक 21/5/2020 चे आदेश आहेत. अकोला  महानगरपालिका क्षेत्र रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे अकोला शहरात अत्यावश्यक सेवा व कृषी विषयक आस्थापना सुरु असून अन्य सर्व आस्थापना बंद आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अफवा पसरवण्यासाठी हा मेसेज व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने  सायबर सेल कडे तक्रार केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे-मुबंई संदर्भातील पोस्ट खोडसाळ

मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवार पासून १० दिवसांसाठी पूर्णत: लष्कराच्या लॉकडाऊनमध्ये असणार अशी सावध करणारी एक बातमी सध्या व्हॉटसएप ग्रुप्समध्ये फिरते आहे. यात महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल असे या पोस्टमध्ये म्हणले आहे. सदरहू पोस्ट पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती टाकली आहे असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

......

टिप्पण्या