Corona virus news:वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सज्ज!

वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सज्ज!
महानगर पालिका शाळा क्र. २२ कृषिनगर येथे कम्युनिटी क्लिनिक सुरू 

 अकोला: महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवादिवसेंदिवस वाढत चालला आहे . कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेवर ताण येत असल्याने शहरातील आय एम ए , निमा , जीपीए , हिम्पा , आयडीए डॉक्टर्स असोसिएशन चे डॉक्टर्स मदतीसाठी पुढे सरसावले आहेत . त्या पृष्ठभूमीवर रुग्ण तपासणीसाठी कृषिनगर परिसरातील महानगर पालिका शाळा क्र 22 मध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत कम्युनिटी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे . 
 कोरोनाचा संसर्ग शहरातील विविध भागात होत असल्याने संशयित रुग्णांचा शोध घेताना महापालिका प्रशासनाची दमछाक होते आहे . शहरातील वैद्यकीय यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पाहून नागरिकांच्या सुविधेसाठी वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांना समोर येण्याचे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केले होते , मनपा आयुक्तांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत डॉक्टरांच्या विविध संघटना समोर आल्या आहेत . बुधवारी कृषिनगर मधील महानगर पालिका शाळा क्र 22 मध्ये रुग्णाच्या तपासणीसाठी कम्युनिटी क्लिनिक सुरु करण्यात आले . 
या क्लिनिक मध्ये नागरिकांची तपासणी व उपचार मोफत करणे , संशयित रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. कम्युनिटी क्लिनिक मध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत रुग्णांची तपासणी व उपचार केले जातील . कृषिनगर स्थित कम्युनिटी क्लिनिक सुरू करताना  डॉ . प्रशांत मुळावकर , डॉ . पराग टापरे , डॉ . सुनील बिहाडे , डॉ . ज्योती कोकाटे , डॉ . मनोहर घुगे , डॉ . आनंद चतुर्वेदी , डॉ. मिलिंद बडगुजर , डॉ . विनय दांदळे , डॉ . विजय हिवराळे डॉ . अरविंद गुप्ता यांचे सह आशा वर्कर उपस्थित होते . 
यावेळी डॉ . पराग टापरे यांनी कोरोना च्या संदर्भात मार्गदर्शन केले . या सेवेचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने डॉ . मिलिंद बडगुजर आणि डॉ . विनय दांदळे यांनी केले आहे .

 वैधकीय क्षेत्रातील विविध संघटना कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी सज्ज
(कोरोना) कोविड 19 संसर्गाचा प्रकोप आटोक्यात  आणण्यासाठी अकोला शहरातील इंडियन मेडिकल असोसीएसन,जनरल प्रॅक्टिसनर्स असोसीएशन,नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसीएशन,इंडियन डेंटल असोसिएशन,होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसनर्स असोसीएशन,आरोग्य भारती,यांनी जिल्हाधिकारी जितेंद्रजी पापळकर, महानगरपालिका आयुक्त कापडणीस साहेब,आरोग्य अधिकारी डॉ फारुख शेख यांच्या मार्गदर्शनात व आव्हानानुसार कोरोना संसर्गाचा अटीतटीच्या प्रसंगाची जाणीव ठेवत जेष्ठ नागरिक,दुर्धर आजार ग्रस्त यांच्या विशेष तपासणीसाठी व प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्नासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी कम्युनिटी  क्लिनिक पश्चिम झोन श्रीमती कस्तुरबा गांधी रुग्णालय डाबकी रोड, पूर्व झोन कृषिनगर म न पा शाळा क्र १२,मध्य झोन काला चबुतरा डॉ जम्मू खान यांचे चॅरिटेबल क्लिनिक अकोला येथे सुरू करण्यात आले असून अकोट फाईल भागात प्रस्तावित आहे, निशुल्क,रुग्णसेवेचा लाभ या भागातील रुग्णांनी सकाळी ९ ते ११ या वेळेत घ्यावा असे आव्हान डॉ कमल लड्डा,डॉ अमोल केळकर,डॉ पराग टापरे, डॉ प्रशांत मुळावकर,डॉ सुनील बिहाडे,डॉ संदीप चव्हाण,डॉ सौ ज्योती कोकाटे,डॉ मनोहर घुगे,डॉ चंद्रकांत पनपालिया,डॉ राजेंद्र वानखडे,डॉ दिनेश राठी,डॉ श्रीपाद पुसेगावकर,डॉ योगेश पाटील यांनी केल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे डॉ अशोक ओळंबे व डॉ रणजित देशमुख यांनी दिली.
कम्युनिटी क्लिनिक मध्ये सेवा देतांना डॉ अनुप कोठारी, डॉ सौ ज्योती कोकाटे,डॉ योगेश पाटील,डॉ अथर पांडे,डॉ राजेंद्र वानखडे,डॉ अशोक ओळंबे,डॉ जम्मू खान,डॉ सौ प्रिया मायी,डॉ आशिष पनपलिया,डॉ मिलिंद पवार.

वैधकीय क्षेत्रातील विविध संघटना कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी सज्ज,शहरातील महत्वाच्या 3 भागात कम्युनिटी क्लिनिक सुरु
(कोरोना) कोविड 19 संसर्गाचा प्रकोप आटोक्यात  आणण्यासाठी अकोला शहरातील इंडियन मेडिकल असोसीएसन,जनरल प्रॅक्टिसनर्स असोसीएशन,नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसीएशन,इंडियन डेंटल असोसिएशन,होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसनर्स असोसीएशन,ओल्ड सिटी जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन,आरोग्य भारती,यांनी जिल्हाधिकारी जितेंद्रजी पापळकर, महानगरपालिका आयुक्त संजयजी कापडणीस,आरोग्य अधिकारी डॉ फारुख शेख यांच्या मार्गदर्शनात व आव्हानानुसार कोरोना संसर्गाचा अटीतटीच्या प्रसंगाची जाणीव ठेवत जेष्ठ नागरिक,दुर्धर आजार ग्रस्त यांच्या विशेष तपासणीसाठी व प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्नासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी कम्युनिटी  क्लिनिक पश्चिम झोन श्रीमती कस्तुरबा गांधी रुग्णालय डाबकी रोड, पूर्व झोन कृषिनगर म न पा शाळा क्र १२,मध्य झोन काला चबुतरा डॉ जम्मू खान यांचे चॅरिटेबल क्लिनिक अकोला येथे सुरू करण्यात आले असून अकोट फाईल भागात प्रस्तावित आहे, निशुल्क,रुग्णसेवेचा लाभ या भागातील रुग्णांनी सकाळी ९ ते ११ या वेळेत घ्यावा असे आव्हान डॉ कमल लड्डा,डॉ अमोल केळकर,डॉ पराग टापरे, डॉ प्रशांत मुळावकर,डॉ रणजित देशमुख,डॉ सुनील बिहाडे,डॉ संदीप चव्हाण,डॉ सौ ज्योती कोकाटे,डॉ मनोहर घुगे,डॉ चंद्रकांत पनपालिया,डॉ अशोक ओळंबे,डॉ राजेंद्र वानखडे,डॉ दिनेश राठी,डॉ श्रीपाद पुसेगावकर,डॉ योगेश पाटील यांनी केले तसेच विविध भागातील कम्युनिटी क्लिनिक मध्ये डॉ अनुप कोठारी, डॉ सौ ज्योती कोकाटे,डॉ योगेश पाटील,डॉ अथहर पांडे,डॉ राजेंद्र वानखडे,डॉ अशोक ओळंबे,डॉ जम्मू खान,डॉ सौ प्रिया मायी,डॉ आशिष पनपलिया,डॉ मिलिंद पवार आपली सेवा प्रदान केली.
     कोरोनाचा संसर्ग नसलेल्या कम्युनिटी क्लिनिक मधील रुग्णाची, ज्यामध्ये जेष्ठ नागरिक,दुर्धर आजारग्रस्त व अत्यावश्यक सेवेसाठी खालिल डॉक्टरांच्या दवाखान्यात मोफत तपासणी करण्यात येउन मार्गदर्शन करण्यात येईल यासाठी डॉ अरुण राठी,डॉ अंकुश अजमेरा डॉ मुकेश राठी,डॉ सौ सीमा तायडे,डॉ ऐश्वर्या पराडकर,डॉ महेश गांधी,डॉ श्रीपाद रत्नाळीकर,डॉ अश्विन खंडारे, डॉ मनीष श्रीवास्तव,डॉ स्वप्नील वाठ, डॉ प्रशांत पोफळकर,डॉ जुबेर खान,डॉ समीर मालवीय,डॉ प्रशांत अग्रवाल,डॉ प्रमोद चिरानिया,डॉ प्रशांत वायचाळ हे सेवा देतील ह्याची नोंद रुग्णांनी घेण्याचे आवाहन यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध संघटनांच्या वतीने डॉ रणजित देशमुख व डॉ अशोक ओळंबे यांनी केले.

टिप्पण्या