corona virus news:अकोल्यात १३१ पॉझिटिव्ह रुग्ण घेताहेत उपचार

अकोल्यात १३१ पॉझिटिव्ह रुग्ण घेताहेत उपचार

अकोला,दि.११: आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ९५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९० अहवाल निगेटीव्ह तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १५९ झाली आहे. आज सकाळी उपचार सुरु असतांना एका ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १३१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज अखेर एकूण १८३३ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १६०३ अहवाल आले आहेत.आज अखेर एकूण १४४४ अहवाल निगेटीव्ह तर १५९ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  २८० अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण १८८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १६८३, फेरतपासणीचे ९८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६०३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १४०३ तर फेरतपासणीचे ९८ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४४४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १५९ आहेत. तर आजअखेर २८० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या ९५ अहवालात ९० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी  किल्ला चौक जुने शहर येथे राहणारा एक ११ वर्षाचा मुलगा, तीन पुरुष व एक महिला आहेत. हे रुग्ण, मोठी उमरी, आंबेडकर नगर सिव्हील लाईन्स, आगरवेस, जुने शहर आणि अकोट फैल या भागातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

दरम्यान आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एका ६५ वर्षीय रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. हा रुग्ण बैदपुरा भागातील रहिवासी होता व तो  शनिवार, दि. २ रोजी दाखल झाला होता.

१३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत  १५९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १४ जण (एक आत्महत्या व १३ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना तर बुधवार दि.६ मे  रोजी एकास असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १३१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आज अखेर १५६८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ८४६ गृहअलगीकरणात व ७६ संस्थागत अलगीकरणात असे ९२२ जण अलगीकरणात आहेत. तर ४९८ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर १४७ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली

टिप्पण्या