Corona virus news:वाढत्या रुग्णसंख्या पाहता उपचारासाठी आता खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्याची प्रक्रिया

वाढत्या रुग्णसंख्या पाहता उपचारासाठी आता खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्याची प्रक्रिया

    वाढती रुग्णसंख्या पाहता खाजगी        रुग्णालये अधिग्रहणाचा पर्याय

अकोला,दि.७: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही वाढ सातत्याने महानगरपालिका हद्दीत असली तरी संपूर्ण जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी वाढत्या रुग्णसंख्या पाहता उपचारासाठी आता खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे उपचाराची व्यवस्था केली आहे. त्यासोबतच अलगीकरण, विलगीकरण कक्षांसाठी  डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि, पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने अकोला शहरातील खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरु केली आहे. यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे अहवाल मागविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

......

The process of acquiring private hospitals for treatment now in view of the growing number of patients

टिप्पण्या