- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
८३ कामगार बिहारसाठी अमरावतीला एस.टी. बसने विनाशुल्क रवाना
अकोला,दि.१०: अकोला येथे लॉकडाऊन मुळे अडकलेल्या ८३ कामगारांना आज अमरावती येथून विशेष रेल्वेने बिहारकडे मार्गस्थ होण्यासाठी एस.टी बसने रवाना करण्यात आले. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या सर्व कामगारांना हा प्रवास विनाशूल्क झाला.
रविवारी (दि.१०) सकाळी अकोला बसस्थानकावरुन चार बसेस ने हे कामगार रवाना झाले. या कामगारांना अमरावती येथे सोडण्यात येणार होते. तेथून दुपारी दोन वाजता विशेष रेल्वेने हे कामगार बिहार मधील देगुसराय येथे जाणार होते, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिली. यावेळी नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, तहसिलदार विजय लोखंडे यांचीही उपस्थिती होती. या कामगारांना पाण्याच्या बाटल्या. अल्पोपहार देण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा