मजुरांच्या समर्थनार्थ १८ मे रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन

मजुरांच्या समर्थनार्थ १८ मे रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन

अकोला: भारतीय मजुरांच्या प्रती केंद्र आणि राज्य सरकार अमानवीय व्यवहार करीत आहे.या कृतीचा विरोध आणि मजुरांच्या समर्थनार्थ १८ मे रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबत मोर्चाचे राष्टीय संयोजक वामन मेश्राम  यांनी घोषणा केली आहे.

भारत सरकारने संपूर्ण देशातील वेगवेगळ्या राज्यातील कामगारांना सुरक्षित रित्या आठ दिवसाच्या आत त्यांच्या  घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली पाहिजे. फूड कॉर्पोशन ऑफ इंडिया यांच्या गोदाम मधील माल,वस्तू गरजू लोकांना आणि कामगारांना वाटून दिली पाहिजे, या दोन प्रमुख मागणी साठी आंदोलन करण्यात येत आहे.     या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार संपूर्ण शक्ती निशी सहभागी होणार आहे,अशी माहिती राष्टीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र इंगोले यांनी दिली.

......

टिप्पण्या