वाशिम जिल्ह्यात लालपरी रस्त्यावर .

वाशिम जिल्ह्यात लालपरी रस्त्यावर ...
File image
अकोला: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दळणवळणाची सर्व साधनांची चाक बंद करण्यात आली होती.मात्र ,आता तब्बल दीड महिन्यानंतर वाशिम जिल्ह्यातील एस टी महामंडळाच्या गाड्यांची चाक धावण्यासाठी सज्ज झाली आहेत.वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने येथे एस. टी. सेवा सुरू करण्यात आली आहे.
फिजिकल डिसटंसचे आणि शासकीय नियमांचे पालन करुन जिल्ह्याअंतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर लालपरी आता रस्त्यावरुन धावणार आहे. जिल्ह्यात सध्या ५० टक्क्यांवर ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तर या बसेस केवळ तालुका ते तालुका आणि यामध्ये येणाऱ्या गावापर्यंतच  धावणार आहे. प्रवाश्याचे हित हे ब्रिद घेवुन एस टी प्रवाशांच्या सेवेत आहे .मात्र, जिल्ह्यातील बहुतांश बस स्थानकावर शुकशुकाट पसरलेल दिसून येत आहे.लॉक डाउनच्या काळात वाशिम डेपोला सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे.उद्यापासून दैनंदिन फेऱ्या पेक्षा ५० टक्क्यांवर बस फेऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. एस टी ची चाक जरी धावण्यासाठी सुसज्ज असली तरी  कोरोनाच्या भीतिने प्रवाश्यांच्या अभावी चाक थांबलेलीच आहे.
......

टिप्पण्या