आनंदीवार्ता:बुलडाणा कोरोनामुक्त!

आनंदीवार्ता:बुलडाणा कोरोनामुक्त!
बुलडाणा,दि.१० : कोरोना विषाणूने सर्वांना अस्वस्थ करून सोडले आहे. सुरूवातीच्या काळात कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांच्या यशासाठी  ‘गो.. गो.. गो.. कोरोना’ हा संदेशही धावून आला. या संदेशामुळे सकारात्मकता निर्माण होण्यास मदत झाली. कोरोना विरूद्धच्या लढ्यात प्रशासन जोरकस प्रयत्नांसह मैदानात उतरले. सर्वांनी धीर गंभीर होत या लढ्यात प्रशासनाची मदत केली. विषाणूने जिल्ह्यात २४ व्यक्तींभोवती आपला फार्स टाकलाच होता. त्यामध्ये एक  मृत झाल्यामुळे २३ रूग्ण कोरोनाशी झुंज देत होते. हे सर्व २३ रूग्ण आजच्या तीन रूग्णांसह कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले. खऱ्या अर्थाने गो कोरोना गो हा नारा, संदेश आज परिस्थितीचे सत्य प्रकट करतो. ठणठणीत बरे झाल्याने व कोरोना निगेटीव्ह अहवाल आल्यामुळे जिल्ह्यातील तीन रूग्णांना आज कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली आहे.  
......

टिप्पण्या