परवनगी नसलेल्‍या व्‍यावसायिक प्रतिष्‍ठान धारकांनी आपली दुकाने उघडू नये – मनपा प्रशासन.

परवनगी नसलेल्‍या व्‍यावसायिक प्रतिष्‍ठान धारकांनी आपली दुकाने उघडू नये – मनपा प्रशासन.
अकोला : अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत रतनलाल प्‍लॉट येथे बिना परवानगीने ड्रीम हाउस नावाने या कापड विक्रीची दुकान उघडून व्‍यवसाय करीत असल्‍याचे आढळून आल्‍यावर त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करून त्‍यांचे प्रतिष्‍ठान बंद करण्‍यात आले तसेच त्‍या परिसरातील ब्‍युटी पॅलेस, लिबाज लेडीज वेअर व संजिली गिफ्ट, श्री गिफ्ट अॅण्‍ड जनरल तसेच  सातव चौक येथील शीतल जनरल स्‍टोर्स या प्रतिष्‍ठान धारकांनी दुकानाची साफ-सफाई करण्‍यास सुरूवात केली असता त्‍यांना ताकीद देउन दुकाने बंद करण्‍याची  कारवाई मनपा अतिक्रमण व बाजार विभागाव्‍दारे करण्‍यात आली.
यावेळी बाजार अधिक्षक संजय खराटे, गौरव श्रीवास, सुरेंद्र जाधव, रविंद्र निवाणे, सुधाकर सदांशिव, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे आदिंची उपस्थिती होती. तरी शहरातील नागरिकांना मनपा प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात येते कि, ज्‍या व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांना परवानगी नाही अशा दुकानदारांनी कोरोनाचा संक्रमण थांबविण्‍यासाठी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी आपली प्रतिष्‍ठाने बंद ठेउन मनपा प्रशासनास सहकार्य करावे.
.........

टिप्पण्या