चार दिवसापासूनचा अंधार पालकमंत्री बच्चू कडुंच्या एका फोनमुळे दोन तासात दूर

चार दिवसापासूनचा अंधार पालकमंत्री बच्चू कडुंच्या एका फोनमुळे दोन तासात दूर
शेतकऱ्याने पाठवलेल्या तक्रारीच्या एसएमएसवर पालकमंत्र्यांच्या तात्काळ कारवाई

अकोला: पारस विद्युत निर्मिती प्रकल्पातुन राखेची वाहतूक  करणाऱ्या ट्रकमुळे पारस शिवारातील विद्युत वाहिनीच्या तारा तूटल्याने चार दिवसापासून बंद असलेला विद्युत पुरवठा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्तक्षेपा नंतर अवघ्या दोन तासातच सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी  पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांप्रती दाखविलेल्या कळवळीमुळे शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.पारस येथील शेतकरी श्रीकृष्ण वाघ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना  महावितरणचे अभियंता दाद देत नसल्याने त्यांनी थेट पालकमंत्र्यांच्या भ्रमणध्वनीवर एसएमएस पाठवून याबाबतची तक्रार केली होती,विद्युत पुरवठा चार दिवसांपासून बंद असल्याने ओलितासोबतच शेतशिवारात ठेवलेल्या गुरांना प्यायला पाणी नसल्याने याची तात्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अभियंत्याना तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देताच चार दिवसांपासून बंद असलेला विद्युत पुरवठा अवघ्या दोन तासातच सुरू झाल्याने शेतकरी भाजीपाला पिकांना व गुरांना वेळेत पाणी देऊ शकले.

मान्सूनपूर्वी महावितरणने दुरुस्तीची कामे करावी-पालकमंत्री
महावितरणने ऐनवेळेवर धावपळ टाळण्यासाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्त्या मानसुनपूर्वी कराव्या व नागरिकांच्या तक्रारी संवेदनशीलपणे सेवा हमी कायद्यातील तरतुदींचे पालन  करून वेळेत सोडवाव्या असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले.नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या  विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
.........

टिप्पण्या