नारद जयंती:आद्य पत्रकार, महागुरु व एकमेव देवऋषी नारदमुनी

नारद जयंती:आद्य पत्रकार, महागुरु व एकमेव देवऋषी नारदमुनी
देवलोक, पृथ्वीलोक आणि पाताळ लोकांमध्ये फिरणारे देवऋषी नारद आद्य पत्रकार असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवांचे मानस पुत्र असलेले तरी ते फार मोठे विष्णूभक्त होते. नारायण, नारायण, असा अखंड जप त्यांचा सुरू असायचा. 
नारायण, नारायण, असा अखंड जप सुरू असलेले आद्य पत्रकार देवऋषी नारद यांची आज जयंती आहे. वैशाख वद्य प्रतिपदा या तिथीला नारदमुनींचा अवतरण / जन्म झाला, असे सांगितले जाते. हा दिन नारद जयंती म्हणून साजरा केला जातो. ब्रह्मदेवांचे सात मानस पुत्र पैकी एक असलेले देवऋषी नारद तीनही लोकांमध्ये मुक्त संचार करीत असत.    
ब्रह्मदेवांचे मानस पुत्र असले, तरी नारदमुनी हे श्रीविष्णूंचे परमभक्त होते. श्रीविष्णूंचे नाव नारदमुनींच्या मुखी कायम असायचे. देवलोक, मनुष्यलोग आणि पाताळलोकात नारदमुनींना कुणीही आडकाठी करू शकत नव्हते. 
देवऋषी  नारद मुनींनीकठोर तपश्चर्या करून  ब्रह्मश्रीचे पद मिळवलं. भगवान श्री विष्णुचे नारदमुनी हे परम भक्त आहे. 
'नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे
नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे आणि इतरांनासुद्धा भक्तीमध्ये,भक्तिरसामध्ये लावून सोपा मार्ग दाखवणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. रामायण-महाभारतातच नव्हे तर तिन्ही चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये देवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच. वीणा हाती घेऊन ते तिन्ही लोकांमध्ये सप्तपाताळांमध्ये भ्रमण करत असतात.
त्यांना स्वर्गलोक, मृत्यूलोक व पाताळलोक या तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो. त्यांचे एका हाताता वीणा असते तर एका हातात चिपळ्या. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात. ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. कीर्तनकलेचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.
नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्‍नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.पण या कळ लावण्यामध्ये सुद्धा जगाचे हित असते.

प्रा वंदना शिंगणे 
अकोला

टिप्पण्या