पोलिसच करतात जेंव्हा वर्दीचा अनादर!भर रस्त्यातच आपसात जुंपली;लॉकडाउनचे नियमही धाब्यावर!

पोलिसच करतात जेंव्हा वर्दीचा अनादर!

भर रस्त्यातच आपसात जुंपली;

लॉकडाउनचे नियमही धाब्यावर

अकोला : कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस चोखपणे आपलं कर्तव्य बजावत आहे.मग ती गरजूंना मदत असो , मास्क न लावणाऱ्यावर कारवाही असो , की फिजिकल डिस्टनसिंग ठेवण्याची विनंती करणे असो...पोलिसांचा धाक म्हणा किंवा आदर...सामान्य लोक पोलिसांचे ऐकतात… परन्तु एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाला सूचना केली तर ती त्याच्या जिव्हारी लागते...असाच काहीसा प्रकार अकोला शहरात घडला.

अकोल्यात आज कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला वर्दीवर नसलेल्या पोलीस आणि त्याच्या पत्नीने बेदम मारहाण केलीय.ही घटना अकोल्यातील आळशी प्लॉट येथे घडलीय.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने या दाम्पत्याला फिजिकल डिस्टनसिंग ठेवण्याची विनंती केली. आणि वर्दीवर नसलेल्या पोलीस आणि वर्दीवर असलेल्या पोलिसात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.बाचाबाचीचा प्रतिसाद हाणामारीत परिवर्तित झाला.उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला . मात्र ,याचा काही उपयोग झाला नाही.या भांडणात पोलीस पत्नीने सुद्धा उडी घेतली.वर्दीवर असलेल्या पोलिसाला काठीने मारहाण केली.हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचल खरं मात्र दोन्ही पोलीस असल्याने हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले. याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.मात्र, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मात्र, या घटनेने काही प्रश्न उपस्थित होत आहे.  वर्दीवर असलेल्या पोलिसाच काही चुकलं ही असेल तर त्याला मारहाण करणं योग्य आहे का,वर्दीची इज्जत पोलीसवालेच जर करत नसतील तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा करावी,या प्रश्नची उत्तरे देखील अनुत्तरीतच राहतील. आपसात मारहाण करून लॉकडाउन मधील नियमांची पायमल्ली या दोन पोलिसांनी केली, हे प्रकरण पोलीस विभागाने जरी आपसात मिटवले. तरी जिल्हा प्रशासन याबाबत किती गांभीर्याने दाखल घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

......

टिप्पण्या