- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोल्यात आज सहा पॉझिटिव्ह; उपचार दरम्यान वृद्धाचा मृत्यू
अकोला, दि.२: शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून,आज सकाळी प्राप्त वैद्यकीय तपासणी अहवाल नुसार सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, काल रात्री एका वृद्ध रुग्णाचा उपचार घेत असताना मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कडून प्राप्त झाली.
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण मोहमद अली रोडवरील रहिवासी आहे, तर उर्वरित पाच हे एका मयत पॉझिटिव्ह महिला रुग्णाच्या संपर्कातील आहेत. ते सर्व जण एका खाजगी रुग्णालयात काम करतात. त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. मयत महिला शासकीय रुग्णालयात येण्याआधी या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती.
दरम्यान, काल(दि.१)रोजी दाखल ७९वर्षीय रुग्णाचा उपचार घेताना काल रात्री मृत्यू झाला आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली
कोरोना अलर्ट
आज दि.२ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल- ४७
पॉझिटीव्ह- सहा
निगेटीव्ह- ४१
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा