सेवाकार्य करु इच्छिणाऱ्या डॉक्टर्सना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सेवाकार्य करु इच्छिणाऱ्या डॉक्टर्सना जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अकोला,दि.२८:कोरोना विषाणू  संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणा  परिस्थितीचा मुकाबला करीत आहे. तथापि या कार्यात ज्या डॉक्टर्सना स्वतः हून सेवा कार्य म्हणुन मदत करावयाची असेल त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. त्यासाठी डॉक्टर्सनी आपली नावे जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे द्यावीत. जेणे करुन त्यांच्या सेवेचा लाभ हा कोवीड उपचारासाठी करता येईल.

बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती तात्काळ कळवा
सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊन असून जिल्ह्याच्या सिमाही बंद आहेत. तथापि आडमार्गाने कुणीही व्यक्ती बाहेरगावाहून वा अन्य शहरातून आपल्या गावात दाखल झाल्यास त्याबाबत तात्काळ ग्रामस्तरीय समितीने त्याची माहिती घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करावयाची असून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावयाची आहे. याबाबत जर हेतू पुरस्कर माहिती दडवण्याच्या प्रयत्न झाल्यास ग्रामस्तरीय समितीस जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.
......

टिप्पण्या