- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संचारबंदी ३ मे पर्यंत कायम;
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोला,दि.१४: जिल्ह्यात १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असलेली संचारबंदी रविवार ३ मे पर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत. या आदेशांनुसार जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व सेवा बंद राहतील. या संचारबंदी आदेशातून औषधे, दूध, बॅंक व्यवहार, कृषी निविष्ठा व यंत्रसामुग्रीची प्रतिष्ठाने, गॅस, पाणी, वीज पुरवठा आदी अत्यावश्यक सेवा पुर्वी दिलेल्या आदेशानुसार व त्या कालमर्यादेत सुरु राहतील. या आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चा ४५ च्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा