२९६ पैकी २१९ जणांचे अहवाल प्राप्त, २०६ निगेटिव्ह

२९६ पैकी २१९ जणांचे अहवाल प्राप्त, २०६ निगेटिव्ह

                संंग्रहीत चित्र

अकोला,दि.१४ : जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आज अखेर २०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह अहवाल संख्या १३ वर कायम आहे. त्यातील एका रुग्णाने  आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात १२ पॉझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) १० जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत २९६ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी २१९ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून २०६ निगेटिव्ह आहेत. तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली.

दरम्यान जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या प्रवाश्यांची संख्या ३४९ असून त्यातील ६८ जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थागत अलगीकरणात आहेत. ३३ जण विलगीकरणात आहेत.  अद्याप १५२ जणांचे अलगीकरणाचे १४ दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप ७७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाली आहे.

टिप्पण्या