राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी मनिषा शेजोळे यांची निवड.

*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी मनिषा शेजोळे यांची निवड.*
*जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम क्रमांक -*

अकोला:राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (एमएससीईआरटी), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला आणि शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2019- 2020 चे आयोजन करण्यात आले होते. पाच गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अकोला पंचायत समिती अंतर्गत पाचमोरी जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा शेजोळे यांची निवड झाली असून त्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवोपक्रम राबवले जात असल्याने शिक्षण क्षेत्रात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील प्रत्येक मूल प्रगत व्हावे यासाठी प्रत्येक शिक्षक नवनवीन प्रयोग करीत आहे. विद्यार्थी व शाळांच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग नवोपक्रमशील शिक्षक करीत आहेत. शिक्षकांच्या या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे नवोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन पाच गटात करण्यात आले.
यानुसार अकोला जिल्ह्यात जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. समग्र शिक्षानुसार एमएससीईआरटी च्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा पाच गटात आयोजित करण्यात आली होती. नुकताच जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जिल्हा प्रशासनाचे वतीने मा.डॉ.समाधान डुकरे - प्राचार्य, डाएट अकोला यांचे मार्फत जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटात पाचमोरी जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा मधुसूदन शेजोळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेकरिता त्यांच्या नवोपक्रमाची निवड झाली आहे. याकरिता त्यांना मा.डॉ.वैशाली ठग - शिक्षणाधिकारी (प्राथमिक), मा.श्री.शाम राऊत - गटशिक्षणाधिकारी, पं.स.अकोला, मा. सौ.कविता बोरसे - अधिव्याख्याता, डाएट व मा. सौ.प्रेरणा मोरे -अधिव्याख्याता, डाएट यांचे मार्गदर्शन लाभले. मनिषा शेजोळे यांची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झाल्याने साने गुरूजी शिक्षक सेवासंघाने विशेष कौतुक केले असून जिल्ह्यातील सर्व शिक्षण प्रेमींतर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
" या स्पर्धेतून राज्यभर विविध उपक्रम राबवणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षकांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले असून या माध्यमातून जिल्हा व राज्यातील दर्जेदार प्रभावी नवोपक्रम निवडून त्यांची इनोवेशन बँक तयार करून मासिकांमधून सर्वांना माहिती दिली जाते."
- मनिषा शेजोळे
  अकोला


टिप्पण्या