- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लॉकडाऊन मध्ये सुध्दा तेवला माणुसकीचा दीपक !
*सत्यशोधक सेवा समितीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपक होसमनी यांनी एका अनोळखी वयोवृद्ध माणसाला मरणयातना भोगत असताना दिला माणुसकीचा हात.*
सांगली : कोरोना विषाणू नेे सांगली जिल्हा बरोबर महाराष्ट्र राज्यावर सुद्धा मोठे संकट निर्माण केले आहे. या संकटाला लढा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात संचार बंदीचा आदेश लागू केलेला आहे.
तरी सर्व सामान्य नागरिक या संचार बंदीचा नियम पाळताना दिसून येत नाहीत पण पोलिस प्रशासन मात्र रात्रंदिवस स्वतःच्या परिवाराचा विचार न करता शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करत असताना रोडवर आपली ड्युटी बजावत आहेत आरोग्य कर्मचारी व पोलिस प्रशासन सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरले आहेत या करिता सामाजिक बांधिलकी जपत सत्यशोधक सेवा समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष रामचंद्र हरिबा लोंढे तथा राज्य कार्याध्यक्ष मुकुंद इंगरुळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपक यल्लाप्पा होसमनी महिला आघाडी कार्याध्यक्ष शारदा नरेंद्र तिरमारे कडेगाव तालुका अध्यक्ष प्रवीण बाळाराम कदम या सर्वांनी पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना मास,हँड वॉश वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्यात संचार बंदीच्या आदेशा मुळे रस्त्यावर राहणाऱ्या गरीब, बेघर भिक्षेकरी,लोकांची गैरसोय होत आहे. शासनाने या लोकांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
*सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपक यल्लाप्पा होसमनी यांना १० एप्रिल रोजी एका परिचित नागरिकाने फोनवर माहिती दिली की एक वयोवृद्ध आजोबा रस्त्यावर पडलेले आहेत त्यांना खूप मरणयातना होत आहेत भुकेने व्याकुळ झालेली आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये खूप अशक्तपणा दिसून येतो आहे ते मदतीसाठी टाहो फोडत आहेत प्लीज आपण सत्यशोधक सेवा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आहात त्यांच्यासाठी काही करता येत असेल तर पहा अशा पद्धतीचा फोन त्यांना आला आणि लगेच सत्यशोधक सेवा समितीचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष अविनाश राठोड यांना सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपक यल्लाप्पा होसमनी यांनी फोनद्वारे संपूर्ण माहिती दिली. लगेच अविनाश राठोड यांनी सांगली जिल्हा अध्यक्ष रामचंद्र लोंढे आणि जिल्हा उपाध्यक्ष दीपक होसमनी यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या अनोळखी वयोवृद्ध आजोबांना प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगणगाव बुद्रुक या ठिकाणी योग्य उपचाराकरिता भरती करण्याचे फोन करून सांगितले त्यामुळे अनोळखी वयोवृद्ध आजोबांना दवाखान्यामध्ये योग्य उपचाराकरिता नेण्याकरिता गेले असता वयोवृद्ध आजोबांचे पूर्णपणे कपडे फाटलेले होते.*
*सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष दीपक होसमनी यांनी माणसा मधली माणुसकी जपत त्या वयोवृद्ध अनोळखी आजोबांना अंघोळ घातली त्यांचे कपडे बदलले त्यांना जेवण दिले व त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगणगाव येथे त्यांचेवर योग्य उपचार चालू केले* पण संपूर्ण दिवसभर उन्हामध्ये रस्त्यावर पडलेले होते त्यामुळे त्यांना उन्हाचाही चांगलाच तडाखा बसल्यामुळे त्या वयोवृद्ध अनोळखी आजोबांची परिस्थिती नाजूक झाली होती डॉक्टरांनी त्यांना लगेचच सांगली येथील शासकीय जिल्हा सामान्यरुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये हलवले पण दुसऱ्या दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. सत्यशोधक सेवा समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी त्या वयोवृद्ध अनोळखी आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा