- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोल्यातील सात रुग्ण कोरोना मुक्त
अकोला: जिल्ह्यातील सात कोरोना रुग्णाना पूर्ण उपचारानंतर गुरुवारी घरी सोडण्यात आले.सातही पातूर येथील आहे. अकोलेकरांसाठी हे निश्चितच दिलासादायक आहे. मात्र, तीन पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचा चवथ्या चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.कोरोना अलर्ट*
*आज गुरुवार दि.२३ एप्रिल २०२० रोजी दुपारी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल- २१
पॉझिटीव्ह- तीन (चवथ्या चाचणी अखेर)
निगेटीव्ह-१८( प्राथमिक तपासणी)
(आज प्राप्त अहवाल हे प्राथमिक तपासणीचे आहेत)
*दरम्यान आज दुपारी पातूर येथील सात जणांना पूर्ण उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
सात रुग्ण कोरोना मुक्त-विडीओ
जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती-
व्हिडीओ
कोरोना योद्धांचे कौतुक!
कोरोना विरुद्धची लढाई त्या सातही जणांनी जिंकली होती. आणि त्या लढाईचे शिलेदार, साक्षीदार सगळं प्रशासन होतं. कोरोना विरुद्ध प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात राहून उपचार करणाऱ्या या टिम मध्ये डॉ.मुकुंद अष्टपुत्रे, डॉ.सुनिता आडे, डॉ.प्रिती लाहोरे, डॉ.श्रेय अग्रवाल, डॉ.अंकुश तोष्णिवाल, डॉ.मेघा आर्य, डॉ.मेघा चोपडे, डॉ.आमेरा सेत , डॉ.प्रविण सपकाळ, डॉ.संदीप आगरकर, डॉ.उपेंद्र कंझरकर, डॉ.विरेंद्र मोदी ,अधिसेविका श्रीमती.ग्रेसी मरीयम स्वच्छता निरीक्षक हेमंत इंगळे व उमेश रामटेके यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या टिमचे कौतूक केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा