स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार दस्त नोंदणी सुरू करण्याचे आदेश

स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार दस्त नोंदणी सुरू करण्याचे आदेश
       संंग्रहीत चित्र

अकोला,दि.२०:कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन अकोला जिल्हयातील दुय्यम निबंधक कार्यालये व त्यातील स्थाबर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार दस्त नोंदणी दि.३०मार्च रोजीच्या आदेशान्वये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. ते पूर्ववत सुरू करण्याचे आदेश आज देण्यात आले.
मात्र संचारबंदीतुन काही बाबी वगळण्याबाबत दिलेल्या दि.१९ रोजीच्या आदेशान्वये स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार सुरु करुन मुद्राक शुल्क विषयक ऑनलाईन प्रणालीव्दारे दस्त नोंदणी पूर्ववत सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांनी आज दिले आहेत. या व्यवहारांची व नोंदणीची प्रक्रिया पार पाडताना जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक व सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार कलम 144 चे तसेच Social Distansing चे पालन करून, तसेच कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेवुन पुर्ववत सुरु करण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे.

टिप्पण्या