अकोला जिल्ह्यात आता १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

अकोला जिल्ह्यात आता १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

अकोल्यात आता १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

अकोला:कोरोना विषाणूचा आता अकोल्यातही प्रादुर्भाव वाढला आहे. शुक्रवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तेरा झाली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

मंगळवारी शहरात २ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती.त्यानंतर पातूर मध्ये ७ बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने अकोला जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज त्यात ४ रुग्णाची भर पडली असल्याने 'कम्युनिटी स्प्रेड'ची श्यक्यता नाकारता येत नाही.नागरिकांनी अधिक सतर्कता पाळण्याची आवश्यकता आहे.

आज ३५ संदिग्ध रुग्ण दाखल

आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) ३५ जण संदिग्ध रुग्ण म्हणुन दाखल झाले. त्यात पातूर येथे काल (दि.९) आढळलेल्या सात रुग्णांच्या  ३१ कुटूंबियांचाही समावेश आहे. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत १८७ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी १३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १२६ निगेटिव्ह आहेत. तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून ३१६ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ९५ जण अद्याप अलगीकरणात आहेत. (७८ जण गृह अलगीकरणात तर १७ जण संस्थागत अलगीकरणात) तर १३८ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर अहवाल प्रलंबित असलेले ६१ व त्यापूर्वीचे २१ जण असे ८२ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली

कोरोना अलर्ट

१० एप्रिल २०२०

आज दाखल संदिग्ध रुग्ण-३५,

आजपर्यंत दाखल एकूण संदिग्ध रुग्ण- १८१

आज डिस्चार्ज दिलेले संदिग्ध रुग्ण-६,

आजपर्यंत डिस्चार्ज दिलेले एकूण संदिग्ध रुग्ण- ८०

आज तपासणीसाठी पाठवलेले नमुने-३५

आजपर्यंत तपासणीसाठी पाठवलेले एकूण नमुने-१८१

आज प्राप्त अहवाल-१३

आजपर्यंत एकूण प्राप्त अहवाल-१२०

आज प्रलंबित अहवाल-३५

आजपर्यंतचे एकूण प्रलंबित अहवाल-६१

आज प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह-९

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल-१०७

आज प्राप्त अहवालापैकी पॉझिटिव्ह-४

आजपर्यंत प्राप्त  अहवालापैकी एकूण पॉझिटिव्ह-१३

आज दाखल प्रवासी-३५

आजपर्यंत दाखल एकूण प्रवासी-३१५

अलगीकरणात दाखल प्रवासी-९५ (गृह अलगीकरण ७८, संस्थागत अलगीकरण १७)

अलगीकरणाचा १४ दिवस कालावधी पूर्ण झालेले संदिग्ध रुग्ण-१३८

विलगीकरणात दाखल रुग्ण-८२

वैद्यकीय निरीक्षणाचा पाठपुरावा सुरु असलेले प्रवासी- ३

वैद्यकीय निरीक्षणाचा पाठपुरावा सुरु असलेले एकूण-९५

वैद्यकीय निरीक्षणाचा पाठपुरावा आज पूर्ण झालेले प्रवासी-७

वैद्यकीय निरीक्षणाचा पाठपुरावा पुर्ण झालेले एकूण प्रवासी- १३८


( स्रोत:जिल्हा माहिती कार्यालय, अकोला )                    …………………...


टिप्पण्या