Big breaking:१३ एप्रिल रोजी दाखलझालेल्या त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह;रुग्णाचा मृत्यू

१३ एप्रिल रोजी दाखल झालेल्या त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह;रुग्णाचा मृत्यू

   

संपर्कातील व्यक्ती रुग्णालयात दाखल

अकोला,दि १५:अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मधुमेह,उच्च रक्तदाब, खोकला या आजाराने ग्रस्त ४५ वर्षे वयाचा रुग्ण सोमवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दाखल झाला होता. खबरदारी म्हणून त्या रुग्णाचे घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणी साठी घेण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत व्यक्ती अकोला शहरातीलच रहिवासी आहे.

दरम्यान, आज दि.१५ रोजी सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १४!

दरम्यान,१४ एप्रिल रोजी जिल्ह्यात  सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. दिवस अखेर २०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह होते. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह अहवाल संख्या १३ होती. त्यातील एका रुग्णाने  आत्महत्या केल्याने जिल्ह्यात १२ पॉझिटीव्ह रुग्ण होते. दरम्यान,१५ एप्रिल रोजी प्राप्त अहवाल नुसार संदिग्ध रुग्णचा अहवाल हा पॉझिटिव्ह असल्याचा प्राप्त झाला झाल्याने अकोल्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एकूण १४ झाली.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी दिवसभरात  १० जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले होते. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.  २९६ नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी २१९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. २०६ निगेटिव्ह तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली होती.

दरम्यान, जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या प्रवाश्यांची संख्या ३४९ असून त्यातील ६८ जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थागत अलगीकरणात आहेत. ३३ जण विलगीकरणात आहेत.  अद्याप १५२ जणांचे अलगीकरणाचे १४ दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप ७७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १४एप्रिल रोजी देण्यात आली होती.

येथे पहा व्हिडीओ

येथे क्लीक करा

१३ एप्रिल रोजी भरती झालेल्या त्या रुग्णचा अहवाल पॉझिटिव्ह;रुग्णाचा मृत्यू




Comment box मध्ये प्रतिक्रिया लिहावी.

टिप्पण्या