संशयीत करोना रूग्ण तरुणीची ओळख व केस पेपर लीक करणारा विरूद्ध कार्यवाही व्हावी - राजेंद्र पातोडे.

संशयीत करोना रूग्ण म्हणून २४ वर्षीय तरुणीची ओळख व केस पेपर लीक करणारा विरूद्ध कार्यवाही करण्यात यावी - राजेंद्र पातोडे. 


https://youtu.be/AKHweMVnIss
अकोला - येथील २४ वर्षीय तरुणीला अद्याप करोनाची बाधा झाल्याचे कुठलेही लक्षण नाहीत जर्मनी वरून परत आल्याने सावधानी म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयात गेलेल्या २४ वर्षीय तरूणीचे नांव व तिचे केस पेपर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याने तिचे कुटूंबाला धक्का बसला असून जिल्हा मध्ये भीतीची लाट निर्माण झाली असून संबंधित मुलीचे रिपोर्ट येण्यापूर्वी तिला करोना संशयित जाहीर करण्याचा प्रताप करणा-या वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
अकोल्यात कोरोनाचा पहिला संशयीत रुग्ण आढळला अशा आशायाच्या बातमी महाराष्ट्र भर पसरविण्यात आली आहे.मुळ अकोल्यातील रहिवासी असलेली २४ वर्षीय तरुणी जर्मनीला नोकरीसाठी गेली होती.
तिला अकोल्यात ‘कोरोना’चा पहिला संशयित रुग्ण म्हणून जाहीर करण्याचा प्रताप सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता व डॉक्टर यांनी केला आहे. सदर तरूणीचा रिपोर्ट मंगळवारी प्राप्त होणार आहे, त्याचे आधीच तिची ओळख कोरोना पिडीत म्हणून जाहीर करून तिला आयसोलेशन वार्डात दाखल करून उपचार सुरू केल्याची बातमी पसरविण्यात आली.करोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आलेली नसताना हा बिनडोक दावा कसा करण्यात आला याचे उत्तर रूग्णालय प्रशासनाने दिले पाहिजे.
मुळ अकोल्यातील रहिवासी असलेली २४ वर्षीय तरुणी जर्मनीला नोकरीसाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती जर्मनीवरुन भारतात पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यानंतर ती थेट अकोल्यात पोहोचली. घरी आल्यावर तरुणीला ताप येण्यास सुरुवात झाली. प्रकृती खालावत असल्याने आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना? असा संशय आल्याची खोडसाळ बातमी पसरविली गेली. मुळात ती तरूणी ठणठणीत असून कंपनी कडून रूजू होण्यापुर्वी करोनाची टेस्ट करण्याचे सुचविले गेले म्हणून शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तरुणीने वडिलांसह थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात स्वतः गेली होती. तिला कोरोना आयसोलेशन वार्डात तिला दाखल करून तिचे नमुने घेण्यात आले. डॉक्टरांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने तरुणीवर उपचारास सुरुवात करण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचार सुरू आहेत.अश्या बातम्या पसरविण्यात आल्या डॉ घोरपडे व डॉ अष्टपुत्रे यांनी सदर तरूणी सोबत फोटो व  तिची ओळख केस पेपर सोबत सार्वजनिक केल्याने जिल्हा मध्ये दहशत निर्माण झाली आहे. सदर तरूणीला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, गेले दोन दिवस ती कुटूंबातील सदस्यां सोबत होती, असे असताना तिला करोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट येण्याआधी तिची ओळख, फोटो व केस पेपर सार्वजनिक करण्यात आल्याने तिचे कुटुंबातील सदस्यांना नातेवाईक व मिडियाला ऊतर देताना नाकी नऊ आलेत.या मुळे तिचे कुटुंबीय प्रचंड तणावाखाली असून या सर्व प्रकरणाची चौकशी करून मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

टिप्पण्या