बहुचर्चित मुलीचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन

बहुचर्चित मुलीचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन

याच प्रकरणात पोलीस अधीक्षक  गावकर त्यांची झाली होती बदली

अकोला, दि 29: राज्यभर गाजलेल्या अकोल्यातील मुली अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी पवन प्रमोद नगरे याची न्यायालयाने आज जमिनीवर सुटका केली.
सात महिन्यापासून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या पवन प्रमोद नगरे व अलका नगरे यांच्याविरुद्ध सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी याची दखल न घेता कारवाई केली नाही. सदर प्रकार उच्च न्यायालय येथे गेल्यानंतर तक्रारीची दखल घेण्यात आली. राज्यभर अनेक मुलींच्या आणि महिलांच्या पलाय नाच्या तक्रारी वाढत गेल्या. सदर प्रकरणी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली आणि त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले होते. गुरुवारी  गुन्हे शाखा अकोलाने नगरे याला अटक करून न्यायालयात हजार केले होते. न्यायालयाने त्याला आज दिनांक 29 मार्चपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आजही पवन नगरे याला न्यायालयात हजर करण्यात आले. सिविल लाइन पोलीस स्टेशन चे निरीक्षक भानू प्रसाद मडावी यांनी आणखी पोलीस कोठडीत वाढ मागितली. पण आरोपीचे वकील त्यांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पोलीस कोठडी नकारात दुय्यम सत्र न्यायाधीश जी डी लांडबडे यांनी 45 दिवसाचा अंतरिम जामीन मंजूर केला. आरोपी चे वतीने अँड सुमीत महेश बजाज, अँड रफिक खाजावाले यांनी काम पाहिले.

टिप्पण्या