जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांना मोक्का लावा - राजेंद्र पातोडे.

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांना मोक्का लावा - राजेंद्र पातोडे.
                 संग्रहित चित्र 
 मुंबई : कोरोनाचे पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन करीत संचार बंदी लागू केल्याने नागरिकांच्या असहयतेचा गैरफायदा घेत असामाजिक तत्वांनी जिवनाश्यक वस्तूंची चढ्या दरात विक्री आणि काळा बाजार सुरू केला आहे, काळाबाजार करणा-यां विरोधात संघटीत गुन्हेगारी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
                संग्रहित चित्र 
कोरोनाचे पार्श्वभूमीवर अचानक मागणी वाढल्याने मास्क व सॅनिटाइजरचा तुटवडा निर्माण झाला होता.सरकारने लॉकडाऊन करीत संचार बंदी लागू केल्याने मुंबई मध्ये काळा बाजार करणा-यां कोट्यावधी रूपयांचे मास्क पोलीसांनी जप्त केलेत.
संचारबंदी मध्ये  नागरिकांच्या असहयतेचा गैरफायदा घेत असामाजिक तत्वांनी जिवनाश्यक वस्तूंची चढ्या दरात विक्री आणि काळा बाजार सुरू केला आहे, भाज्या व फळे यांच्या सोबत किराणा साहीत्य या जिवनाश्यक वस्तू अव्वाच्या सव्वा दराने पुणे येथे विकण्यात आल्या. लॉकडाऊन व संचारबंदी मुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे.कृषी माल तुर्त ऊपलब्ध असला तरी नाकेबंदी मुळे व लोकांमधील भितीचे वातावरण पाहता जिवनाश्यक वस्तूचा पुरवठा व मागणीचे प्रमाण व्यस्त होईल.
                    संग्रहित चित्र 
परिणामी काळाबाजार करणा-यांना अधिक फावणार आहे.गोर गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या शेतकरी, कामगार व मजूरांना ह्याचा फटका बसत आहे.सरकारने यावर उपाय योजना करताना गरीब जनतेला करीता मोफत धान्य, तेल, दाळी, तांदूळ शासकीय यंत्रणा राबवून झोपडपट्टी व स्लम भागात घरोघरी पोहचवण्यासाठी यंत्रणा उभी करावी.तसेच दारिद्र्य रेषेखालील जनतेच्या खात्यात २००० रूपये जमा करावा,तसेच संचार बंदी मध्ये काळाबाजार करणारा विरोधात संघटीत गुन्हेगारी कायदा अंतर्गत मोक्का कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

टिप्पण्या