अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
                    फाईल चित्र
शेतकरी संकटात 
अकोला: अकोला जिल्ह्यात अकोला तालुका पातुर तालुका बाळापूर तालुका तसेच अनेक ठिकाणी महाराष्ट्रात विदर्भात अवकाली पाऊस गारपीटमुळे संकटात असलेल्या शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे. राज्य शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे गहू संत्रा आंबा कांदा हरभरा हे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच नाशिक या भागात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात शासनाने तातडीने मदत द्यावी ऑक्टोंबर महिन्यानंतर सतत तिसऱ्यांदा या पावसामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला आधार देण्याची मागणी केली आहे अकोला पातुर तसेच जिल्ह्यात अनेक भागात या गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यामुळे त्यांचे पंचनामे करून शासनाकडे सादर करण्यात यावे तसेच पीक विमा कंपनी संदर्भात कृषी विभागाने सु तातडीने दखल घ्यावी यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांची सुद्धा आमदार सावरकर यांनी संपर्क साधला आहे.


पिकांच्या नुकसानीची पाहणी त्वरीत करावी
वंचित बहुजन आघाडीची मागणी
अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांच्या पिकांचे  नुकसानाची तातडीने पाहणी व पंचनामे करून  नुकसान भरपाई देण्याची  वंचित बहूजन आघाडीची मागणी. 
महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी मुळे हिरावला गेला आहे.या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. 
युद्ध पातळीवर नुकसानीची पाहणी करून त्याबाबत मदतीचा अहवाल तातडीने शासनाला पाठवण्याच्या यावा.तसेच सरकारने देखील विनाविलंब ही नुकसान भरपाई सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्याचे आवाहन देखील राजेंद्र पातोडे यांनी केले आहे.

टिप्पण्या