श्रीरामनवमी शोभायात्रा समितीची नियोजन सभा

श्रीरामनवमी शोभायात्रा समितीची नियोजन सभा
    संग्रहीत फोटो:nms

अकोला: मध्य भारतातील सर्वात मोठी इतिहासिक संस्कृती, समाज प्रबोधन, एकता, धर्म संवर्धन श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने स्थानिक ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरापासून 2 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा तसेच हिंदू नवीन वर्षाच्या 25 मार्च रोजी अकोला पंचक्रोशी मध्ये हजारो अनुदानित राधाकृष्ण प्रतिमा वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती  सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिली.
श्री रामनवमी शोभायात्रा समिती सतत 35 वर्षापासून 365 दिवस सामाजिक दायित्व म्हणून विविध मानवतेचे कार्य करीत असते दरवर्षी हिंदू नवीन वर्षात वेगवेगळ्या प्रतिमा वितरित करण्याचे काम सातत्याने पंधरा वर्षापासून सुरू आहे श्री रामचरण पादुका, राम दरबार, महालक्ष्मी, सूर्य प्रतिमा, विठ्ठल रुक्माई प्रतिमा, हनुमान प्रतिमा छायाचित्र, राम दरबार छायाचित्र, राम हनुमान यंत्र, तिरुपती बालाजी मूर्ती, सर्व कार्य सिद्धि विविध यंत्र वितरीत करण्यात आले आहे. धर्मध्वज चे सुद्धा वितरण करून सर्वांची कल्याणाची कामना समितीच्यावतीने करण्यात आली. यंदा राधाकृष्ण गाय प्रतिमेचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच ७ मार्च रोजी राम व श्रीकृष्ण भक्तांचे मिलन कार्यक्रम स्थानिक मोठ्या राम मंदिरात राधा कृपा सत्संग मंडळच्या सहकार्याने व शहरातील विविध कलाकारांच्या मधुरवाणीत होळीचे भजन पुष्प व परम परंपरागत वृंदावनच्या धर्तीवर होळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तसेच स्थानिक महाराणाप्रताप पार्क, जुने शहर, कपडा बाजार चौकात भव्य देखावे तसेच भव्य विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय सुद्धा आमदार गोवर्धन शर्मा यांनी घोषित केले असल्याची माहिती समितीचे महाव्यवस्थापक गिरीराज तिवारी यांनी दिली. समाजातील सर्व घटक व विविध मातृशक्तीला सोबत घेऊन मातृशक्ती श्री जानकी वल्लभ मातृशक्ती सत्संग मंडळ सातत्याने दर रविवारी मोठ्या राम मंदिरात संकीर्तन व विविध कार्यक्रम आयोजित करीत असते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत कटगी राधाकृष्ण च्या मूर्ती मथुरेहून येणार असून मातृशक्ती व अकोलेकर यांच्या साक्षीने अनुष्ठान करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस समितीचे अध्यक्ष विलास अनासाने गिरीश जोशी गिरीराज  तिवारी,ब्रिजमोहन चीतलांगे, डॉक्टर अभय जैन, डॉक्टर संजय सोनवणे, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, अनिल मानधने, ओम प्रकाश गोयंका, राजेश मिश्रा, सागर भारूका, संजय अग्रवाल, अजय शर्मा, सागर शेगोकार, सतीश ढगे,  प्रतुल हातवळणे, नितीन जोशी, राम ठाकूर, मोहन गुप्ता, नवीन गुप्ता, मनीष बाछुका ,महेश चौधरी, आनंद चांडक, प्राध्यापक अनुप शर्मा, बाळकृष्ण बिडवई, पुष्पा वानखडे, रेखा नालट, मनीषा भुसारी, पद्मा अडसुळे, कल्पना अडसुळे, वैशाली शेळके, वैशाली सावजी, चंदा शर्मा, अर्चना शर्मा,  शंकर खोवाल, सागर तिवारी, देव किसन राठी, विजय इंगळे निलेश निनोरे, संजय जिरापुरे, गणेश काळकर, रमेश आलकरी, सुमन देवी अग्रवाल, विनायक शांडिल्य, गुरुजी श्रीराम देशमुख, बनवारीलाल बजाज,रमेश कोठारी,हरिभाऊ काळे,पिंटू काळे,हरीश आलिम चंदाने, मनोज बिसेन, वसुधा बिडवई ,अलका देशमुख
बैठकीच्या आरंभी दिल्ली येथे पोलीस हेडकॉन्स्टेबल रतनलाल अग्र व आयबी अधिकारी अमित शर्मा शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीआदी प्रामुख्याने उपस्थित होते बैठकीचे संचालन संदीप वाणी प्रास्ताविक राम ठाकूर तर आभार प्रदर्शन  अनिल गवई  यांनी केले .

टिप्पण्या