- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बुढन गाडेकर , संज्योती चंदन उत्कृष्ट क्रीडा शिक्षक
पालकमंत्री यांच्या हस्ते सम्मानित
अकोला:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे वतीने वर्षभरात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते
यावर्षी हा पुरस्कार ताज इंग्लिश हायस्कूचे क्रीडां शिक्षक तथा जिल्ह्याच्या बोक्सिग क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे बुढन गाडेकर तथा विविध स्पर्धांच्या संयोजिका क्रीडा क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्तिमत्व मनुताई कन्या शाळेच्या संज्योती चंदन या दोघांनाही जाहीर झाला असून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ना बच्चूभाऊ कडू यांचे हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर ,जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ,निवसी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे,जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव तथा क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते
या दोघांनाही मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्रीडा संघटना तथा समस्त शारिरिक शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात येत असून क्रीडा कार्यालयाने या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल शासनाचे शारिरिक शिक्षक महामंडळ यांनी शासनाने आभार मानले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा