तुम्हीच बना तुमच्या जीवनाचे शिल्पकार-राजेश खवले.

तुम्हीच बना तुमच्या जीवनाचे शिल्पकार-राजेश खवले.
अकोला: आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अतिशय प्रामाणिक व कठोर मेहनत घेऊन विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीत असो तो जीवनात उच्च शिखर गाठल्या शिवाय राहत नाही, असे प्रेरणादायक उद्‍गार अकोला जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, राजेश खवले साहेब यांनी काढले. निमित्त होते राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित विशेष शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे.कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर, दत्तक ग्राम हिंगणा- कुंभारी येथे सुरू असून या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राजेश खवले यांनी उद्घाटनपर भाषणांमधून आपले मत व्यक्त करताना उपस्थित रा.से.यो. स्वयंसेवक व गावकरी मंडळी तसेच प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय बजरंग मंडळ कुंभारी चे अध्यक्ष तसेच माजी आमदार व माजी अध्यक्ष, विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर, तुकाराम  बिरकड हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर चे सन्माननीय तज्ञ सदस्य तसेच मार्गदर्शक डॉ.संजय खडक्कार हेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे आराध्यदैवत वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पर भाषणातून प्राचार्य, डॉ.के.व्ही. मेहरे यांनी सात दिवस चालणाऱ्या निवासी विशेष शिबिराचा आढावा घेऊन शिबिरांमधून सादर होणाऱ्या कार्यक्रमांविषयी उपस्थित मान्यवरांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या ओघवत्या शैलीत मा. तुकाराम भाऊ बिरकड यांनी उपस्थित विद्यार्थी व गावकऱ्यांशी सुरेख संवाद साधून अनेक उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब यांनी आपण जीवनात कसे घडलो त्याबद्दल प्रेरक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले व विद्यार्थ्यांनीही कठोर परिश्रम घेऊन व मेहनत घेऊन वाचन करून, अभ्यास करून आपले जीवन घडवावे असे मत मांडले. कार्यक्रमाचे   प्आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ.बी.यु. जमनिक यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

टिप्पण्या