- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ग्रामीण भागातील तरुणांनी समोर आले पहिजे-निशांत धापके
अकोला:आज चित्रपट लेखक आणि इतर तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे यांना पाहिजे ती प्रसिध्दि मिळत नाही म्हणून यांकडे तरुणांचा कल कमी दिसुन येतो हिरो आणि हिरोईन होण्याकडे जास्त तरुणांचा कल दिसून येतो. अभिनय सोडून बाकीच्या क्षेत्रात संधी असून तरुण जात नसल्याने ते क्षेत्र जास्त कोणाला अवगत नाही. त्यामुळे नव तरुणांना याचं आकर्षण यावं आणि संधी मिळावी यासाठी मी अकोल्यात आलो आहे तरुणांना मायानगरीत न बोलावता त्याच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे असे मत आज फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या तसेच राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्र शासनाने पुरस्कृत केलेले लेखक तथा सह दिग्दर्शक निशांत धापके यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले
भविष्यात येणाऱ्या चित्रपटासाठी विदर्भातील आणि प्रामुख्याने अकोल्यातील तरुणांना संधी निर्माण करण्याचा माफक प्रयत्न करीत आहे.
या पत्रकार परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे ,प्रा. राहुल माहूरे ,प्रा आकाश हराळ, अकोल्यातील चित्रपट कलावंत विक्की मंगला मोटे ,कुणाल मेश्राम, विशाल नंदागवळी, अमित लोंढे,राहुल कुरे,आदित्य बावनगडे, अभय तायडे, सोनू वासनिक, प्रशांत खंडागळे, आकाश शेंडे ,सिद्दु डोंगरे,धम्म वाघमारे,प्रज्वल मेश्राम,प्रथमेश मडामे आदी उपस्थित होते..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा