विठ्ठलराव वानखडे ग्रामोद्योग वसाहतीला प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट

विठ्ठलराव वानखडे ग्रामोद्योग वसाहतीला प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट
कारखान्या बाबत जाणून घेतली अधिक माहिती 

अकोला: जिल्ह्यात उच्च पदावर कार्यरत असतांना उद्योजक  बनविण्याचे स्वप्न  पाहणारे हर्षदीप कांबळे यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहण्यासाठी अकोला जिल्ह्यातील वाशिंबा येथील बुपोसो मार्केटींग कंपनीने उभारलेला विठ्ठलराव वानखडे ग्रामोद्योग वसाहत मध्ये 25 महिलांना अगरबत्तीचा उद्योग उभारुन दिला. त्या ग्रामोद्योगाला महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव श्री हर्षदीप कांबळे यांनी विठ्ठलराव वानखडे ग्रामोद्योग वसाहतीमधील युनिटला भेट दिली. त्यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.  उद्योजिका सरिता दुधंडे यांच्याकडून संपूर्ण अगरबत्ती तयार करण्याची प्रक्रिया समजून घेतली. मशिन कोठून घेतली, कच्चा मोल कोठून घेता, पक्का माल कोठे विकता, एकुण मजुर किती आहेत. त्यांना मजुरी किती देता? उत्पादन कसे आणि किती होते आदी माहिती घेतली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम उपस्थित होते. यावेळी राजेंद्र वानखडे, , डी. गोपनारायण, सुभाष गवई, तुषार गोपनारायण, उद्योजिका सरिता दुधंडे, उद्योजक संजय इंगळे, उद्योजक पुरुषोत्तम वानखडे, उद्योजिका ज्योत्स्ना दुधंडे, उद्योजिका माया इंगळे, उद्योजक शांताराम घनबहादूर, उद्योजिका सोनिया शिरसाट, उद्योजक नरेंद्र दुधंडे, उद्योजिका पुजा गोपनारायण, उद्योजक विशाल वाहुरवाघ, उद्योजिका प्रिती इंगळे, उद्योजक मनिष तायडे, उद्योजिका मोनिका तायडे, उद्योजक प्रशांत मेश्राम, उद्योजक प्रफुल्ल आठवले, उद्योजिका अमिता दंदी, उद्योजक राजुभाऊ वानखडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  

टिप्पण्या