- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सुनील वानखडे यांना शिवप्रेरणा पुरस्कार जाहीर
अकोला: उरळ बु येथील रहिवाशी सुनील भाऊराव वानखडे (सहाय्यक शिक्षक) , अकोला जिल्हा संघटक -महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटना,मुंबई32 शाखा-अकोला तथा आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू यांना, या वर्षी चा मांवसेवा विकास फाउंडेशन च्या वतीने 19 फेब्रुवारी शिवजयंती महोत्सवात सदाशिव पेठ,पुणे येथे होणाऱ्या भव्य समारंभात *महाराष्ट्र राज्यस्तरीय शिवप्रेरणा* पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.सुनील वानखडे हे एक आंतराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक-मार्गदर्शक म्हणून खेळाडू व दिव्यांग खेळाडू यांच्या साठी काम पाहतात, हे निवासी शाळा शेळद येथे उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन आतापर्यंत 14 वेळा रक्तदान करून रक्तदान शिबिरांचेही आयोजन करता..अंधश्रद्धा निर्मूलन , दिव्यांग मतदान जागृती, गेल्या 13-14 वर्षांपासून दिव्यांग-अंध यांच्यासाठी क्रीडा या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.. त्यांचे 100 च्या वर दिव्यांग-अंध खेळाडू यांनी राज्यस्तरावर त्याच्या मार्गदर्शनात अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मैदानी स्पर्धा, व्हीलचेअर तलवारबाजी, बैठक हॉलिबाल, पावरलिफ्टिंग ,क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन ,स्वीमिंग अशा विविध खेळात अकोल्याच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.सामाजिक कार्यात सदैव आपले योगदान देणारे सुनील वानखडे याना मिळालेल्या राज्य स्तरिय शिव प्रेरणा पुरस्कार मिळाल्या बद्दल --देवराव वानखडे(उपसरपंच उरळ बु), निवासी शाळा, शेळद, दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटना अकोला, अकोला जिल्हापॅरालीम्पिक असोसिएशन अकोला, समाजकल्याण कर्मचारी संघटना गट(क),अकोला,सम्राट ग्रुप,उरळ बु. सुधीर कडू , संजय बरडे, सिद्धार्थ शिरसाठ, मो. अजीज,श्रीकांत देशमुख,अनिल इंगळे, यांनी त्यांचे अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा