दीपक सदाफळे यांचा गौरव

दीपक सदाफळे यांचा गौरव
अकोला:संकटात सापडलेल्यांना वाचवुन मदतीचा हात देणा-यांसाठी स्वताचा जिव धोक्यात घालुन मानवतेचा आदर्श निर्माण करणारे. दीपक सदाफळे पिंजर ( *जिवरक्षक* ) आणी त्यांचे सहकारी यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी चंद्रीकानदीच्या आणी करकम नाल्याच्या पुरामुळे मध्यभागी अडकून पडलेल्या एकुण 27 रोपवन करणारे वनविभागाच्या मजुरांची त्यांच्या सामानासह आपला जीव धोक्यात घालुन यांची सुखरुप सुटका केली होती.
22 सप्टेंबर रोजी टाकळी खु. जिल्हा अकोला येथील जमीरशहा रोशनशहा या युवक शेतातुन घरी परतत असताना मोहाडी नदीच्या पुरात वाहून गेला होता यासाठी सर्च ऑपरेशन राबवून या युवकाचा शोध घेत घेत जिवरक्षक दीपक सदाफळे पिंजर यांनी तब्बल दीडशे किलोमीटर पर्यंत पुर्णानदीपात्रात शोधण्यासाठी तिन दीवस सतत सर्च ऑपरेशन राबवित शेवटी जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर स्तित तापी पुर्णानदीपात्राच्या संगमावर जमिरशहा याचा मृतदेह शोधुन बाहेर काढला यासह जिल्ह्यात गणेश विसर्जन आणी पालखी सोहळा तथा विविध यात्रा परीसरात आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन व्यवस्थितपणे पार पाडले.
 अशा या साहसी व धाडसी अशा उल्लेखनीय केलेल्या कामगीरीची अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेऊन
 प्रजासत्ताक दिनाच्या आयोजित कार्यक्रमात शास्त्रीय स्टेडीयमवर 26 जानेवारी 2020 रोजी पालकमंत्री  बच्चु कडु  यांच्या हस्ते आणी जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर ,पोलिस अधीक्षक अमोघ गांवकर उप-जिल्हाधिकारी राजेश खवले ,निवासी उपजिल्हा अधिकारी प्रा.संजय खडसे ,
उपविभागीय अधिकारी  निलेश अपार,महापौर  अर्चना म्हसने आदी मान्यवरांच्या उपस्थित प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले. यावेळी   दीपक सदाफळे  यांनी  उपस्थित पाहुण्यांचे आभार  व्यक्त केले.

टिप्पण्या