38 व्या राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेकरिता विदर्भ संघ निवडीची प्रक्रिया 8 ला पातुरला

38 व्या राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेकरिता विदर्भ संघ निवडीची प्रक्रिया 8 ला पातुर येथे
अकोला : 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमधील पुष्कर येथे 38 व्या राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातील संघ सहभागी होणार असून, विदर्भ संघाच्या निवडीची प्रक्रिया 8 फेब्रुवारीला पातुर येथे होणार आहे. अशी माहिती विदर्भ आर शूटिंगबॉल संघटनेचे अध्यक्ष रामप्रसाद शेळके, सचिव शकील काजी यांनी दिली आहे.  या निवड प्रक्रियेत विदर्भातील जिल्हा शूटिंगबॉल संघटनेतील महिला व पुरुष संघ सहभागी होणार आहेत. या निवड प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 8 फेब्रुवारीला 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा