तान्हाजी: द अनसंग वॉरियरशिवाजी महाराजांच्या पत्नीच्या भुमिकेत अकोल्याची कन्या


तान्हाजी चित्रपटात सोयराबाई यांची भूमिका साकारणारी डॉ. इलाक्षी मोरे-गुप्ता

तान्हाजी: द अनसंग वॉरियर

शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या भुमिकेत अकोल्याची कन्या


  1. अकोला नगरीतील कन्या डॉ.इलाक्षी मोरे-गुप्ता ही संपूर्ण भारतात प्रदर्शित झालेल्या अजय देवगण यांच्या
  2. बिग बजेटच्या तान्हाजी दि अनसिन वॉरिअर या चित्रपटात महत्वाच्या भुमिकेत झळकली.
  3. .ही अकोलेकरांसाठी  अतिशय अभिमानाची बाब आहे.
  4. विदर्भातील अकोला शहरातील सिव्हील लाईन चौकात असलेल्या
  5. मोरे पॅथॉलॉजीचे संचालक डॉ.शशीकांत मोरे आणि डॉ. मिनाक्षी मोरे यांची इलाक्षी ही कन्या आहे.
इलाक्षी तान्हाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई मोहिते यांची भुमिका साकारत आहे.
शिवाजी महाराजांची भुमिका प्रख्यात मराठी अभिनेता शरद केळकर यांनी साकारली आहे.
या चित्रपटात इलाक्षी प्रख्यात अभिनेते अजय देवगण, काजोल मुखर्जी, सैफ अली खान यांच्या सोबत दिसत आहे.
तानाजी हा अजय देवगण यांचा अतिशय बहुचर्चित व महत्वकांक्षी चित्रपट आहे.
सुमारे तीन वर्षापासून चित्रीकरण सुरू  असलेला हा हिंदी चित्रपट बिग बजेटचा आहे.
थ्रीडी स्वरूपाचा आहे.
हिंदी भाषेसोबतच मराठी भाषेतही प्रदर्शित होत आहे.
शिवाजी महाराजांच्या काळातील अतिशय पराक्रमी योध्दा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे.
अतिशय थरारक दृश्ये, राजेमहाराजांचे भरजरी पोषाख या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.
या चित्रपटाबाबत बोलताना अजय देवगण म्हणाले की, इतिहासामध्ये अनेक शुरवीर योध्दे होवून गेले .
इतिहासात त्यांची नावेअजरामर झाली आहेत.
परंतू नविन पिढीस त्यांची माहिती नाही.
नव्यापिढीला त्यांची पुन्हा एकदा माहिती व्हावी,
त्यांचा. पराक्रम जगासमोर पुन्हा एकदा यावा व त्या निमित्ताने त्या वीरांना मानाचा मुजरा करावा
,या उद्देशाने अशा वीरांवर चित्रपट निर्माण करण्याचा माझा मानस आहे.
माझ्या या संकल्पनेतील पहिला चित्रपट तानाजी हा आहे.
तानाजीची भुमिका स्वत: अजय देवगण यांनी केली आहे.
अशा या महत्वकांक्षी चित्रपटात अकोल्याची इलाक्षी काम करीत आहे.
ही अकोल्याची सांस्कृतिक व कला क्षेत्रासाठी महत्वाची बाब आहे.
इलाक्षीने २०१५ साली मिसेस इंडिया ग्लोब ही पदवी मिळविली होती.
तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट तान्हाजी आहे.
या चित्रपटातील शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या भुमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली.
त्यात इलाक्षीने बाजी मारून ही भुमिका पटकाविली.
या चित्रपटाच्या निमित्ताने तीची बॉलीवुड क्षेत्रात एन्ट्री झाली.
यापूर्वी इलाक्षीने कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला या आॅल्टबालाजी वेबसिरीज मध्ये काम केले आहे.
तानाजी नंतर इलाक्षी कडे अनेक हिंदी चित्रपटांच्या आॅफर आल्या असून भविष्यात अकोल्याची ही कन्या बºयाच चित्रपटातून दिसणार आहे.

  • डॉक्टर, सुपरमॉडेल आणि अभिनेत्री इलाक्षी ही डेन्टल सर्जन असून,
  • तिचे पती डॉ. अनिकेत गुप्ता हे सुध्दा प्रख्यात डेन्टल सर्जन आहेत.
  • पुण्यातील बालेवाडी परिसरात त्यांचे रू ग्णालय आहे.
इलाक्षीने सैफ अली खान यांचे सोबत बाजार चित्रपटात मुख्य भुमिका साकारली असून,
या भुमिकेसाठी तिला अवार्ड देखील मिळाला आहे.
आगामी सातारचा सलमान आणि लव बेटिंग या मराठी चित्रपटात तिची मुख्य भुमिका आहे. 
तानाजी या चित्रपटात भुमिका करताना इलाक्षीला तिचा अनुभव विचारला असता तिने सांगितले की,
माझ्या जीवनातील ही अप्रतिम कलाकृती असून,
ती मी जीवनात कधीच विसरणार नाही.
शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारणे हे अतिशय मोठे चॅलेंज माझ्या समोर होते.
व त्यात मी यशस्वी झाली. ही माझ्यासाठी एक मोठी परीक्षा पास करण्यासारखे होते.
या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळेस आपण शिवाजी महाराजांच्या काळातच वावरत असल्यासारखे पदोपदी भास होत होता.
आमच्या शुटींगच्या सेटवर वावरणाºया प्रत्येक कलावंत मराठा लुकमध्ये शाही वस्त्र परिधान केलेला होता.
त्यामुळे असे वाटत होते की, त्याकाळातील मोठमोठ्या राजे व वीरांसोबत मी प्रत्यक्ष खरोखरच वावरत आहे.
भविष्यात तर चित्रपट खूप मिळतील पण असा राजेशाही थाटाचा
वीरयोध्दा तानाजींच्या जीवनावरील चित्रपट माझ्याकरिता ‘न भुतो न भविष्यती’ असाच राहणार आहे.
                                                                                                                          
                                                                                                                        

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा