मातंग समाजाचा मोर्चा; आंदोलकांवर गुन्हे दाखल

मोर्चेकरांवर गुन्हे दाखल

मरोडा गावातील मुलीवर अत्याचार

मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा


दि. 14.12.2019 रोजी ग्राम मरोडा येथील मातंग समाजाच्या मुलीवर गाव गुंडानी तिचा
मानसिक व शारीरीक छळ करुन तिला फासावर लटकविले यासाठी अण्णाभाऊ साठे क्रांती
सेना, बहुजन समाज संघटना, लहुजी शक्ती सेना व समस्त मातंग समाजाच्या वतीने दि.
20.1.2020 रोजी मोर्चा काढण्यात आला होता. सदरहु मोर्चाला रितसर परवानगी न घेण्याचे
कारण अथवा न देण्याचे कारण सदरह मोर्चासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे एक वेळेस
नव्हे तर दोन ते तीन वेळेस परवानगी साठी गेलो होतो. पोलीस प्रशासनाने मोर्चा काढू नका
यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल, रहदारी वाढेल असे अनेक वेगवेगळे उत्तरे देवुन परवानगी
नाकारली पण या मधील गांभीर्य सत्य असे आहे की, त्यामध्ये खर म्हणजे मोर्चाचा पहिली
मागणी मरोडा या गावचे पोलीस स्टेशन दहिहांडा येथील ठाणेदार श्री. प्रेमानंद कात्रे, बिट
जमादार श्री. शाम बुंदेले यांनी या प्रकरणात योग्य तपास न केल्यामुळे यांना निलंबीत करण्यात
यावे अशी या मोर्चाची पहिली मागणी होती.


'
यामुळे पोलीस प्रशासनाने ही परवानगी नाकारली आहे. याचा अर्थ असा होतो की,
पोलीस प्रशासनाची बदनामी होईल, अधिकारी व कर्मचाऱ्याचे हलगर्जीचे लक्षणे समोर
येतील यामुळे परवानगी नाकारली म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना व उच्च अधिकाऱ्यांना
विनंती करतो की, परवानगी का नाकारली याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी
करतो व तसेच आमच्यावर दाखल केलेले फौजदारीचे गुन्हे ही चौकशी झाल्यास खरे आहे
की खोटे हे सत्य समोर येईल.
महत्वाचे म्हणजे या दिवशी या मार्गावरुन किंवा इतर मार्गावरुन कुठलाच मोर्चा नव्हता
या परवानगी नाकारली. आम्ही मोर्चा काढतांनी कुठलीही तोडफोड तसेच राष्ट्रीय
संपत्तीचे नुकसान न करता शांततेत मोर्चा पार पाडला. आज देशामध्ये कु. अभया हिच्या जो
अत्याचार झाला तसेच कोपर्डी प्रकरणात अन्याय, अत्याचार झाला यावर देशभरात मोठया
प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाल. याना पोलीस परवानगी होती काय? म्हणन मी
शासनाच्या निदर्शनास आणून देतो की, पोलीस प्रशासन छोटया छोटया समाजाचा आवाज
दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि आमच्या सारख्या सामान्य लोकांवर काही कारण नसतांना गुन्हे दाखल 
होत आहे याचा अर्थ असा होता की, खरे गुन्हेगार पोलीसच घडवितो हे सिध्दहोते.म्हणून आमच्यावरील लादलेले फौजदारीचे गुन्हे तो
न्याय दयावा व मोर्चाची परवानगी का नाकारली याचे स्पष्टीकरण
 पोलीस प्रशासनाने दयावे व वरिष्ठ
 अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न करावा. असे न झाल्यास जिल्हयातील तमाम मातंग
बांधव लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करेल.
यावरुन सदर घटनेत असे लक्षात येते की, व्यक्ती स्वतंत्र्य मुल्याचा हा एक खुन आहे की
आज राज्य घटनेने दिलेल्या प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा लोकशाही मार्गाने मोर्चे
काढणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे आणि आमच्यावर केलेली कार्यवाही लोकशाही
विरोधातील आहे.
गजानन शांताराम तायडे, रेखाताई बोदडे, पुरुषोत्तम वाघमारे, बहुजन समाज संघटना संस्थापक अध्यक्ष गौतम कांकाळ, लहुजी शक्ती सेना युवा जिल्हाध्यक्ष राहुल तायडे,लहुशक्ती संघटना संघटक गणेश सपकाळ पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


टिप्पण्या