शारीरिक शिक्षण शिक्षकांचे अमरावतीत महाअधिवेशन.

           शारीरिक शिक्षण शिक्षकांचे
           अमरावतीत महाअधिवेशन.

  मागील वर्षी शारीरिक शिक्षण शिक्षकांचे 
पहिले महा अधिवेशन साईबाबांच्या पवित्र अशा पावन भूमीत शिर्डीत संपन्न झाले होते. शारीरिक शिक्षणाच्या इतिहासात पहिल्यांदा अधिवेशन झाले , तेही चार ते साडेचार हजारांच्या उपस्थितीत मोठया दिमाखात पार पडले. या अधिवेशनाचे संपूर्ण श्रेय महाराष्ट्रातील प्रत्येक सहभागी शारीरिक शिक्षण शिक्षकास जाते, त्याचा तो हकदार आहे.
       या वर्षी महाराष्ट्राची क्रीडा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ( हनुमान आखाडा) येथे २रे महा अधिवेशन होत आहे. क्रीडा क्षेत्रातील एकमेव *पद्मश्री प्रभाकर रावजी वैद्य* यांच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगीरीने अमरावतीचे नाव जगभरात पोहचले. क्रीडा क्षेत्रातील महान अशा संस्थेस भेट देण्याची मनोमन इच्छा शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीची असते. अधिवेशनाचे निमित्ताने येथे होणारी भेट ही अविस्मरणीय ठरणारी असून या स्नेहभेटीतून अनुभवरुपी शिदोरी महाराष्ट्रातला प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षक बरोबर घेऊन जाईल यात तीळमात्र शंका नाही .
       अमरावती येथे होत असलेल्या अधिवेशनाची जबाबदारी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती  ठाकूर व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे माजी विद्यार्थी व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू  कडू यांनी स्वीकारली असल्याने अमरावती अधिवेशन शारीरिक शिक्षण क्षेत्रासाठी पर्वणी ठरल्याशिवाय राहणार नाही 
      अमरावती येथील अधिवेशनासाठी अधिवेशनाचे निमंत्रक शिवदत्त ढवळे , आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अरूणजी खोडस्कर, कार्याध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम उपर्वट, डॉ. नितीन चवाळे, अजय आळशी, अविनाश साळकर* यांच्यासह महाराष्ट्र राज्य  माध्य व उच्च माध्य शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती, म.रा. शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर, क्रीडा विकास परिषद, क्रीडा भारती, मुंबई महानगर पालिका शारीरिक शिक्षण शिक्षक युनीट यांचे सहकार्याने हे अधिवेशन मागील वर्षीच्या तुलनेत मोठे अधिवेशन संपन्न होईल यात शंका नाही .

राजेंद्र कोतकर

उपाध्यक्ष म.रा.शारीरिक  शिक्षण शिक्षक समन्वय समिती

दिनांक- २२-०१-२०२०

अधिवेशन कालावधी-* २६ ते २८ मार्च २०२०

स्थळ- अमरावती



टिप्पण्या