- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रत्येक महिलेने पहिल्यांदा स्वतः च्या आरोग्यावर लक्ष द्यावे - डॉ सीमा तायडे
हळदी कुंकवाचा कार्यक्रमात महिलांना केले आवाहन
अकोला: महाराष्ट्र परीट धोबी सर्व भाषिक संघ यांच्या सयूंक्त विद्यमाने संत गाडगेबाबा संस्थान मोठी उमरी येथे महिला शाखेच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ सीमा तायडे यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले की,महिलांनी प्रथम आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावे प्रत्येक महिलेचे आरोग्य चांगले राहिले तरच पूर्ण कुटुंबातील सदस्य यांचे आरोग्य चांगले राहील असे आवाहन केले
याच कार्यक्रमात शिव शत्रपती पुरस्कार प्राप्त सौ किरण भावेश बुंदेले यांना सन्मानित करण्यात आले आहे
यावेळी सौ किरण बुंदेले यांनी उपस्थित महिलांना स्व संरक्षणाचे धडे घ्यावे असे आवाहन केले यांच्यासोबत निलेश कवडे आणि धोबी समाजाचे आरक्षण ची फाईल केंद्र सरकार कडे पाठविण्यासाठी प्रयत्न करणारे अनिल शिंदे,गोपाल मोकळकर, हरीश मस्के,बाबाराव बेलूरकर ,ओम बुंदेले,भावेश बुंदेले,सचिन शहकार, संतोष मोकळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या हल्दी कुंकवाच्या कार्यक्रमात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तसेच लकी ड्रॉ च्या माध्यमातून सौ मंजुळकर,सौ शीतल बावसकर यांना सौ कल्पना शिंदे,ज्ञानेश्वरी मस्के यांच्या हस्ते पैठणी देऊन गौरविण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ ज्ञानेश्वरी मस्के ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ सीमा तायडे,सौ मोकळकर, ठाकरे ताई ,निशा टिपरे,वसुधा बडगे, सह मोठ्या प्रमाणावर समाज भगिनी यांची उपस्थिती होती याच कार्यक्रमात महाराष्ट्र सर्व भाषिक परीट धोबी संघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ मीना कवडे यांनी सर्व महिला शाखा बरखास्त करण्याची घोषणा केली तर लवकरच नवीन शाखा व कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे असे आश्वासन दिले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाध्यक्षा सौ मीना कवडे,उपाध्यक्षा सीमा मोकळकर ,रेणुका मालाठाने,अमृतकर ,शीतल शहाकार,सीमा संदीप मोकळकर यांनी परिश्रम घेतले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा