राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा भव्य महीला मेळावा

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा भव्य महीला मेळावा.

कार्यक्रमासाठी सिनेतारका सह अनेक क्षेत्रातील महिलां मान्यवरांनी राहणार उपस्थिती 
अकोला: राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी जिल्हा अकोला तर्फे मकर संक्रांत हळदी-कुंकु निमित्त “ बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियान अंतर्गत दि.०२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ठिक ११ वा. प्रमिलाताई ओक हॉल,गांधी रोड,अकोला येथे भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहीती महासंघाचे विदर्भ प्रमुख गजानन भटकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रतिभाताई
शिरभाते यांनी आज पत्रकार परिषदे मध्ये  दिली.
महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. वनिता सुनिल गवई उपस्थित राहणार आहेत.  या महिला मेळाव्यासाठी विशेष अतिथी म्हणून  अर्चनाताई मसने (महापौरअकोला),प्रेमा किरण (अभिनेत्री), सिया पाटील (अभिनेत्री), सलमा खान, न्यायाधिश मुंबई , गौरी सावंत सामाजिक कार्यकर्त्या, शालीनी तायडे निरिक्षक अकोला जिल्हा,  प्राची वखरे (मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र), मिनाक्षी पानझाडे (प्रदेश उपाध्यक्षा), मा. नंदीनी सौंदनकर (राष्ट्रीय कार्याध्यक्षा) आदी  उपस्थित असणार आहेत  तर  या मेळाव्यामध्ये समाजातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अकोला व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार करण्यात येणार आहे व इतर विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी यांचा सुध्दा सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महासंघाचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या मेळाव्यामध्ये प्रतिभा शिरभाते यांची “ बेटी बचाओ-बेटी पढाओ " या नाटीकेचे सादरीकरण होणार आहे. 
हा मेळावा भव्य दिव्य करण्यासाठी  शहर अध्यक्षा छायाताई इंगळे, आशाताई चंदन, मिनाक्षी पानझाडे, संजोती मांगे   विदर्भ प्रमुख गजानन भटकर व राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा हे अथक परिश्रम घेत आहेत
मेळाव्याला विशेष मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र राजुसकर विदर्भ युवा अध्यक्ष, रामाभाऊ उंबरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश ठोंबरे, महानगर अध्यक्ष शिवलाल इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चोपडे, जिल्हा महासचिव सुनिल झेड गवई, जिल्हा उपाध्यक्ष  रोधेश्याम कळसकार, प्राचार्य .प्रभु चापके, जेष्ठ नागरिक अध्यक्ष पांडूरंग वाडेकर, गजानन वजीरे, महानगर उपाध्यक्ष संतोष इंगळे, जिल्हा सचिव अजय पद्मणे, शहर युवक अध्यक्ष सुमित पानझाडे, ग्रामिण युवक अध्यक्ष निलेश बोरकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख योगेश इंगळे,महानगर सचिव अशोक पद्मणे, अकोला तालुका अध्यक्ष किशोर काकडे, बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष संदिप कदम, तेल्हारा तालुका
अध्यक्ष नागोराव ठोसर, अकोट तालुका अध्यक्ष रवि मालखेडे, पातूर तालुका अध्यक्ष छगन पुरुषोत्तम, बाळापूर तालुका अध्यक्ष भोनाजी ठोंबरे, दिपक देवकर, के. टी. पद्मणे , राम शेगोकार, श्माम खंडारे, रमेश भटकर, विशाल देवळे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याला समाजबांधव बंधु-भगीनी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सौ.नंदा प्रकाश ठोंबरे, सौ.दुर्गा शिवलाल इंगळे,सौ. मंगला प्रविण चोपडे, सौ.सविता नंदकिशोर ढाकरे, सौ.रेखा रामाभाऊ उंबरकर, सौ.बबिता इंगळे, सौ.रेखा राजुसकर, सौ. किरण राजुसकर, सौ.नर्मदा वासुदेव गवई (सरपंच,घुसर), सौ.नर्मदा पांडूरंग वाडेकर, सौ.कल्याणी पद्मणे, सौ.शुभांगी खंडारे, सौ.ज्योती मोहोकार, सौ.सविता योगेश मानकर, सौ.अर्चना निलेश बोरकर, सौ.बेबीताई पानझाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे  .

टिप्पण्या