- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
करोडी येथे केले गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे अनावरण
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री नाम . बच्यु कडू अकोला जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आले असतांना नवनाथ बहुउद्देशीय संस्था व गाडगे महाराज संस्था करोडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत गाडगे महाराज पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नाम . बच्चू कडू यांनी संत गाडगेबाबा यांचे अंधश्रद्धा निर्मूलन साठी विज्ञान वादी विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवू शकतात असे मत व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सर्वभाषिक परीट (धोबी) समाजाचे अध्यक्ष देवराव सोनटक्के ,कार्याध्यक्ष अनिल शिंदे, करोडी सरपंच सौ प्रियाताई नवागे ,युवा कार्य कर्ते पवन चित्ते ,प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर आदींनी आपले विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मोंडोकार महाराज यांनी भूषविले . यावेळी संत गाडगेबाबा यांचे पणतू सोनोने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी संत गाडगेबाबा यांच्या आदर्शवत विचारावरच वर्तणूक करीत आहे त्यामुळेच अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सक्षमपणे कार्य सुरू आहे असे सांगितले तसेच विचार व्यक्त करतांना परीट धोबी समाजाच्या प्रस्तावित समस्यांचा गोषवारा मांडला प्रस्ताविक यांनी केले तर सूत्र संचालन प्रसिध्द कवी नरेंद्र इंगळे केले याच कार्यक्रमात कैलास खडसान यांनी गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष अरविंद तायडे,जिल्हाध्यक्ष गोपाल मोकळकर, मनोज दुधांडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीना कवडे,रेणुका दुधांडे, शंकरराव मालठाने,राजेश गीते,वर्षा माहुलकर,सुनीता रामेकार ,व समस्त धोबी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा