- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
water-shortage-in-akola-city-: पाण्याची कमतरता: अकोला शहरात चार दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा आता सहाव्या सातव्या दिवशी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेकरीता मुख्य जलस्त्रोत काटेपुर्णा प्रकल्प (महान) असून आज दि. 15.07.2026 रोजी प्रकल्पामध्ये 15.848 दलघमी (18.35%) एवढा साठा उपलब्ध आहे. सद्यस्थितीत अत्यल्प पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत नसून पाण्याची मागणी वाढत आहे, आणि दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठयामध्ये लाक्षणिक स्वरुपात घट होत आहे. त्यामुळे शहरात 4 दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा दि. 16 जुलै, 2026 पासुन 5 दिवसआड 6 वे दिवशी करण्यात येत आहे. तर काही भागात सातव्या दिवशी पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
या भागात सहाव्या दिवशी पाणी पुरवठा
या अनुषंगाने 65 MLD प्लांट वरील महाजनी जलकुंभ, मोठी उमरी, गुडधी जलकुंभ, नेहरु पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगा नगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ वरुन होणारा मुळ हद्दीतील पाणी पुरवठा 5 दिवसआड 6 वे दिवशी होणार आहे.
या भागात सातव्या दिवशी पाणी पुरवठा
हद्दवाढ भागातील (मलकापुर, शिवापूर, खडकी, शिवर, उमरी, गुडधी, न्यु तापडीया नगर, हिंगणा, सोमठाणा, गिता नगर, गंगा नगर, अयोध्या नगर, मेहरे नगर, गजानन नगर, आश्रय नगर, डाबकी) आणि 25 MLD जलशुध्दीकरण केंद्रावरुन शिवनगर जलकुंभ, आश्रय नगर जलकुंभ, बस स्टॅन्ड जलकुंभ, शिवणी जलकुंभ वरुन होणारा पाणी पुरवठा 6 दिवसआड 7 वे दिवशी होणार होईल.
नागरिकांना आवाहन
अकोला शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन अकोला महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. तसेच नागरीकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करुन पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, मनपा अकोला यांनी केले आहे.
अकोला शहर
काटेपूर्णा प्रकल्प
पाण्याची कमतरता
महान धरण
Akola city
akola news
Water Shortage
Water supply
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा