soyabean-seeds-germination: सोयाबीन बियाणे उगवण प्रकरणात मोठी कारवाई! अकोल्यात ९ बियाणे कंपन्यांविरुद्ध १० ठिकाणी गुन्हे दाखल
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त धडक मोहीम; अत्यावश्यक वस्तू अधिनियम व बीज कायद्यान्वये FIR
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला | नीलिमा शिंगणे जगड
अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची उगवण कमी झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई सुरू केली आहे. आज (दि. १८ जुलै २०२६) जिल्ह्यातील सर्व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ९ बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध १० ठिकाणी गुन्हे (FIR) दाखल केले आहेत.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, संबंधित कंपन्यांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, बीज नियम ६(अ), ७(अ), १९, २१, २३, बियाणे नियम १९६८ चे कलम २३ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही मोहीम संचालक (निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण) सुनील बोरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या आदेशानुसार, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांच्या सूचनेवरून राबविण्यात आली. या कारवाईस जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे सक्रिय सहकार्य लाभले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, कृषी उपसंचालक हरिष देशमुख, कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) नितीन लोखंडे, श्री सालके, मोहीम अधिकारी श्री दांडगे तसेच जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.
गुन्हे दाखल झालेल्या बियाणे कंपन्या
ओसवाल सीड्स
विगर सीड्स
इगल सीड्स
ASSURE सीड्स
इंनोवेज (पार्शव जेनेटिक) सीड्स
ग्रीन गोल्ड सीड्स
दफ्तरी सीड्स
अंकुर सीड्स
बाफना सीड्स
ठळक मुद्दे
सोयाबीन उगवण तक्रारींची प्रशासनाने घेतली गंभीर दखल
अकोला जिल्ह्यात ९ कंपन्यांविरुद्ध १० ठिकाणी FIR दाखल
कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
अत्यावश्यक वस्तू अधिनियम, बीज कायदा आणि BNS अंतर्गत गुन्हे नोंद
,दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा